इतर

आजचे पंचांग व राशिभविष्य दि.१६/०१/२०२२

🌏 दैनिक राशीभविष्य 🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- पौष २६ शके १९४३
दिनांक = १६/०१/२०२२
वार = भानुवासरे(रविवार)

मेष
आवडी-निवडी साठी खर्च कराल. धार्मिक ग्रंथ वाचनात वेळ घालवाल. वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे. कामावर लक्ष केन्द्रित करावे.

वृषभ
आपले मानसिक आरोग्य जपावे. अति विचार करू नयेत. घरासाठी नवीन खरेदी केली जाईल. व्यापारात काही नवीन सुविधा कराल. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो.

मिथुन
आपणहून कोणत्याही गोष्टीत अडकू नका. आपल्या कामात हुशारी दाखवावी. दिवसाच्या सुरूवातीस काही लाभ होतील. काही चांगले बदल अनुभवास येतील. मन प्रसन्न राहील.

कर्क
जुने आजार दुर्लक्षित करू नका. वरिष्ठांच्या आज्ञेचे तंतोतंत पालन करावे. दिवसभर आत्ममग्न राहाल. टीकेकडे फार लक्ष देऊ नये. घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा.

सिंह
स्वत:वरुन इतरांची परीक्षा करा. अपेक्षित उत्तराची वाट पहाल. संमिश्र घटनांचा दिवस. छुप्या शत्रूपासून सावध राहावे. अनोळखी लोकांशी व्यवहार करू नयेत.

कन्या
आवश्यक तिथे आक्रमक पवित्रा घ्यावा. गुंतवणुकीच्या बाबतीत सावध रहा. जोडीदाराचे सहकार्य घ्याल.  स्वत:साठी थोडा वेळ काढावा. कौटुंबिक खर्चात वाढ संभवते.

तूळ
घरात सामंजस्याने वागावे लागेल. नोकरीच्या ठिकाणी प्रशंसा होईल. काही कामे उगाचच अडकून पडल्यासारखी वाटू शकतात. डोकेदुखीचा त्रास संभवतो. टाकलेले पाऊल मागे घेऊ नका.

वृश्चिक
भागीदारीत नवीन संधी प्राप्त होतील. रखडलेल्या गोष्टी पुन्हा चालू होतील. काहीतरी नवीन करण्याचा विचार कराल. वैचारिक गुंतागुंत वाढवू नका. मनातील इच्छा पूर्ण होण्यास वेळ द्या.

धनू
आहाराचे पथ्य न चुकता पाळा. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. नवीन काहीतरी शिकण्याची संधी मिळेल.  परोपकाराचे महत्त्व लक्षात घ्याल. इतरांच्या आनंदात आनंद मानाल.

मकर
नवीन कामे हाती घेण्याचा विचार कराल. भावंडांशी मतभेद संभावतात. सासरच्या मंडळींकडून मदत मिळेल. प्रलंबित कामे अडकून पडू देऊ नका. काही गोष्टीत समाधान मानावे लागेल.

कुंभ
काही गोष्टींचे चिंतन करावे.  जुन्या गोष्टी सोडून द्याव्यात. बोलतांना सारासार विचार करावा. गुंतवणूक करताना फसवणुकीपासून सावध राहावे. जुगारातून लाभ संभवतो.

मीन
अति घाई करू नये. जोडीदाराच्या मताचा अवश्य विचार करावा. कामात गोंधळ उडवून घेऊ नका. घरातील वातावरण खेळकर राहील. प्रवासात किरकोळ अडचणी येऊ शकतात.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏

🙏 सुप्रभात 🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- पौष २६ शके १९४३
दिनांक :- १६/०१/२०२२,
वार :- भानुवासरे(रविवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०७:०६,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:१२,
शक :- १९४३
संवत्सर :- प्लव
अयन :- उत्तरायण
ऋतु :- हेमंतऋतु
मास :- पौष
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- चतुर्दशी समाप्ति २७:१९,
नक्षत्र :- आर्द्रा समाप्ति २६:०९,
योग :- ऐंद्र समाप्ति १५:१९,
करण :- गरज समाप्ति १४:११,
चंद्र राशि :- मिथुन,
रविराशि – नक्षत्र :- मकर – उत्तराषाढा,
गुरुराशि :- कुंभ,
शुक्रराशि :- धनु,
राशिप्रवेश :- मंगळ – धनु १६:३१,
शुभाशुभ दिवस:- दु. ०३प. चांगला दिवस,

राहूकाळ:- संध्या. ०४:४९ ते ०६:१२ पर्यंत,

लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०९:५२ ते ११:१६ पर्यंत,
लाभ मुहूर्त — सकाळी ११:१६ ते १२:३९ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०२:०२ ते ०३:२६ पर्यंत,

दिन विशेष:-
भद्रा २७:१९ नं.,
————–

वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button