फ्रावशी इंटरनेशनल मध्ये व्यवसाय मार्गदर्शन,आर्थिक साक्षरता,सायबर सुरक्षा विषयक प्रशिक्षण

नाशिक प्रतिनिधी
धोंडेगाव आश्रमशाळा व जनता विद्यार्थी वसतिगृह गिरणारे च्या १६० विद्यार्थ्यांसाठी फ्रावशी इंटरनेशनल अकॅडमी मध्ये रोटरी क्लब ऑफ नाशिकचा एक दिवस स्वप्नातला रायला उपक्रम व्यवसाय मार्गदर्शन,आर्थिक साक्षरता,सायबर सुरक्षा विषयक प्रशिक्षण
शनिवार दि २३/११/२०२४ रोजी रोटरी क्लब ऑफ नाशिक तर्फेफ् रावशी इंटरनेशनल अकॅडमी येथे धोंडेगाव आश्रमशाळा व जनता विद्यार्थी वसतिगृह गिरणारे च्या ९९ मुली व ६१ मुले अशा १६० विद्यार्थ्यांसाठी एक दिवस स्वप्नातला रायला शिबीर संपन्न झाले.

शिबिराचे उदघाटन प्रसंगी फ्रावशी संस्थापक व चेअरमन रतन लथ ह्यानी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
रोटरी क्लब ऑफ नाशिक माजी अध्यक्ष दिलीप सिंह बेनिवाल, सचिव प्रशासन शिल्पा पारख, सचिव प्रकल्प हेमराज राजपूत
फ्रावशी ग्रुप ट्रस्टी मेघना बक्षी , फ्रावशी संचालक डॉ मंजू सुरेंद्रन , वृशाली ब्राह्मणकर,हेतल गाला, हृषीकेश समनवार उपस्थित होते.
रोटरी क्लब ऑफ नाशिक ने एक सामाजिक उपक्रम करण्याची संधी दिल्याने कृतार्थ भावना फ्रावशी इंटरनॅशनल अकॅडमी इंटरॅक्ट क्लब विद्यार्थ्यांनी व्यक्त केली
कार्यक्रमात व्यवसाय मार्गदर्शन,आर्थिक साक्षरता,सायबर सुरक्षा ,आरोग्य विषयक प्रशिक्षण हे फ्रावशी इंटरनॅशनल अकॅडमी इंटरॅक्ट क्लब तर्फे देण्यात आले.
ह्याप्रसंगी फ्रावशी इंटरॅक्ट क्लब च्या वतीने क्रिडादिन आयोजित करण्यात आला.

शिबारातील सहभागी विद्यार्थ्यांसाठी विविध क्रिडा स्पर्धा घेवून विजेत्याना पारितोषिक देण्यात आले.
अतिदुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना विविध व्यवसाय संधी व उपयुक्त कौशल्य ह्यांची सविस्तर माहिती देण्यात आली.
आपल्यातील उपजत गुण व कौशल्य ह्यांचा पुरेपूर उपयोग करून मोठी स्वप्न पाहून ध्येय पूर्ती करण्याचा मार्ग मिळाल्याचा शिबिरात सहबागी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.तसेच रोटरी क्लब ऑफ नाशिक,फ्रावशी इंटरनेशनल अकॅडमी,इंटरॅक्ट क्लब ह्यांचे आभार व्यक्त केले.