आजचे पंचांग व राशीभविष्य दि २/०८/२०२३

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- श्रावण ११ शके १९४५
दिनांक :- ०२/०८/२०२३,
वार :- सौम्यवासरे(बुधवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:०८,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०७:०२,
शक :- १९४५
संवत्सर :- शोभन
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- वर्षाऋतु
मास :- अधिक श्रावण
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- प्रतिपदा समाप्ति २०:०६,
नक्षत्र :- श्रवण समाप्ति १२:५८,
योग :- आयुष्मान समाप्ति १४:३३,
करण :- बालव समाप्ति १०:०४, तैतिल ३०:१०,
चंद्र राशि :- मकर,
रविराशि – नक्षत्र :- कर्क – पुष्य,
गुरुराशि :- मेष,
शुक्रराशि :- सिंह,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- उत्तम दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी १२:३५ ते ०२:१२ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०६:०८ ते ०७:४५ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०७:४५ ते ०९:२२ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी १०:५९ ते १२:३५ पर्यंत,
लाभ मुहूर्त — संध्या. ०५:२६ ते ०७:०२ पर्यंत,
❀ दिन विशेष:
इष्टि,
————–
:
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- श्रावण ११ शके १९४५
दिनांक = ०२/०८/२०२३
वार = सौम्यवासरे(बुधवार)
मेष
लव्ह लाइफमध्ये सुसंवाद असेल तसेच आनंद देखील मिळेल. तुमचं नातं सकारात्मक दिशेने वाटचाल करत असल्याचं हे लक्षण आहे. त्यामुळे तुम्हाला आणि जोडीदाराला ज्या गोष्टींमध्ये आनंद मिळेल त्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. कार्यक्षेत्रात नवीन प्रवास सुरू होईल. आर्थिक विकासाला सुरुवात होईल. तुमच्याकडे यश मिळवण्याची क्षमता आहे. त्यासाठी नम्र राहणं आणि योग्य गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आरोग्यासाठी लवचिकता आणि सामर्थ्य गरजेचे आहे. तुम्हाला आरोग्याच्या दृष्टीने अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. पण त्यासाठी खंबीरपणे वाटचाल करणं महत्त्वाचं आहे.
वृषभ
लव्ह लाइफमध्ये सध्याचे नाते मजबूत करत आहात. यातून तुमचे प्रियजनांसोबतचे भावनिक बंध अधिक दृढ होतील. करिअरमध्ये आर्थिक यश मिळेल. मात्र खर्चाच्या सवयीकडे लक्ष द्या आणि योग्य गुंतवणूक करा. बचत करणं भविष्याच्या दृष्टिनं हिताचं ठरेल. जीवनात संतुलन आणण्याची गरज भासू शकेल. शारीरिक आणि मानसिक आरोग्यास पूरक जीवनशैली स्वीकारा. प्रवास फायदेशीर ठरू शकेल. यातून चांगले नेटवर्क तयार करण्याची संधी मिळेल.
मिथुन
नातेसंबंधांत तुमचा आणि जोडीदाराचा संवाद महत्त्वाचा आहे. तुम्हाला आज सत्य बोलण्याची आणि स्वतःशी तसेच इतरांशी प्रामाणिक राहण्याची आवश्यकता आहे. यामुळे जोडीदाराशी चांगले बंध जुळतील. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. नव्या कल्पना सुचतील. अनावश्यक खर्च टाळून योग्य गुंतवणूक करा. नवीन ठिकाणी सहलीला जाणं ही चांगली कल्पना आहे. आरोग्यासाठी योग्य आहार घ्या, जास्त रहदारी असलेल्या ठिकाणी जाणं टाळा. शांत रहा.
कर्क
प्रेम आणि नातेसंबंधात नवीन प्रवास सुरू कराल. यातून प्रगती होईल. करिअरमध्ये नवीन कल्पना सूचतील. त्यामुळे फायदा होईल. प्रगती आणि बदलासाठी धीर धरा आणि नैसर्गिक चक्रावर विश्वास ठेवा. यातून नवीन भागीदारी किंवा यश मिळेल. तुमच्या सभोवतालचे सहायक संबंध आरोग्यासाठी फायदेशीर ठरतील. प्रवासात नवीन दृष्टीकोन मिळेल. नवीन लोक आणि अनुभवाची संधी मिळेल. त्याचा उपयोग दैनंदिन जीवनासाठी होईल.
सिंह
यश आणि कर्तृत्वाच्या जोरावर नातेसंबंधात भरभराट होईल. जोडीदाराशी स्पष्ट आणि प्रामाणिक संवाद ठेवा. यामुळे नात्यात प्रगती होईल तसेच नाते समृद्ध होईल. करिअरमध्ये अनपेक्षित संधी मिळतील. यासाठी धीर आणि चिकाटीने प्रयत्न करा. कामासाठी प्रवास करावा लागू शकतो. त्यातून नवीन संधी मिळतील तसेच फायदा देखील होईल. आरोग्यासाठी व्यायाम करण्याकरिता योग्य ठिकाण आणि माध्यम शोधा. यामुळे आरोग्यात सकारात्मक सुधारणा दिसेल. तसेच नवीन लोकांशी ओळख होऊ शकेल. आजूबाजूला होत असलेल्या किरकोळ चोरीच्या घटनांपासून सावध रहा.
कन्या
आज भागीदारी आणि समतोल या गोष्टींना जास्त महत्त्व असेल. नातेसंबंधात सुसंवादाची गरज आहे. असहमत असलेल्या दोन लोकांमध्ये मध्यस्थी करण्यासाठी आणि वाद मिटवण्याकरिता तुम्हाला बोलावले जाईल. मध्यस्थी करायची की नाही याचा विचारपूर्वक निर्णय घ्या. जुन्या गुंतवणकीतून फायदा मिळेल. प्रवास किंवा नवीन संधीतून देखील फायदा होऊ शकतो. शारीरिक आणि मानसिक संतुलनासाठी आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षणावर लक्ष केंद्रित करा. आध्यात्मिक साधना किंवा आध्यात्मिक गुरुशी संपर्क साधल्यास या गोष्टी साध्य होतील. यातून निश्चितच मनःशांती लाभेल.
तूळ
प्रेमसंबंधात क्षमा, करूणा आणि प्रेम भावनेवर लक्ष केंद्रित करा. हे गुण विकसित व्हावेत यासाठी तुम्ही आध्यात्मिक अभ्यासाकडे आकर्षित होऊ शकता. कृतज्ञतेकडे लक्ष द्या. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. आर्थिक सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी उपचार किंवा मार्गदर्शनाचा शोध घेत असाल तर तुम्हाला आध्यात्मिक स्वरुपाचे मार्गदर्शन आणि सहाय्य मिळेल. सकारात्मक बदल करण्याची प्रेरणा मिळेल. सुरक्षित झोनमधून बाहेर पडा आणि जोखीम स्वीकारा.
वृश्चिक
मजबूत आणि आश्वासक मैत्री करण्याकडे लक्ष केंद्रित कराल. यामध्ये तुमची निष्ठा आणि विश्वास महत्त्वाचा ठरेल. इतरांशी खोल आणि अर्थपूर्ण संबंध तयार होतील. आज मार्गदर्शनाची गरज भासेल तुम्हाला करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी नवीन मार्गदर्शक किंवा शिक्षणाची गरज आहे. यासाठी तुम्ही आज तज्ज्ञ, मार्गदर्शक व्यक्तीचा शोध घ्याल. त्यामुळे नवीन गोष्टी शिकण्यासाठी तयार रहा. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी विचार आणि भावनांकडे लक्ष द्या. यामुळे तुम्हाला नवीन गोष्टी समजतील आणि तुमच्यातील साहसी वृत्ती वाढेल. तुम्ही जर नवीन ठिकाणी प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला नवीन अनुभव मिळतील. काही गोष्टी नव्याने समजतील.
धनू
प्रियजनांसोबतचे भावनिक बंध अधिक दृढ होतील. यासाठी तुम्ही मनमोकळे राहाणं आवश्यक आहे. तुम्ही नाविन्यपूर्ण आणि सर्जनशील कामाकडे आकर्षित व्हाल. यशासाठी नवीन संधी शोधण्याकरता नव्याने विचार करा. यासाठी मनातल्या विचारांनुसार कृती करा. स्वतःवर विश्वास ठेवा नवीन अनुभवांमुळे उत्साह वाढेल आणि प्रगती होईल. सुरक्षित झोनमधून बाहेर पडा. अज्ञात गोष्टींचा शोध घेत त्यांना सामोरे जा. प्रवासाचे नियोजन करत असाल तर त्यातून वैयक्तिक फायदा होईल. परिवर्तनाची संधी मिळेल. प्रवासासाठी रोमांचक अनुभव मिळेल असे नवीन ठिकाण निवडा.
मकर
नवीन प्रेमसंबंध जुळतील. सध्याचं नातं अधिक प्रतिबद्धतेकडे जाईल. तुम्ही जर मनमोकळे राहिलात तर तुमच्या जीवनात नवीन व्यक्ती येऊ शकते. तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा. स्वतःच्या क्षमतेवर लक्ष केंद्रित करा. तुमच्या क्षेत्रातल्या मार्गदर्शक व्यक्तींकडून मार्गदर्शन घेतल्यास फायदा होईल. शंकास्पद स्थिती किंवा असुरक्षिततेचा सामना करत असाल तर आत्मप्रेमाचा सराव करा. तुमच्यातील अद्वितीय गुणांकडे लक्ष द्या. विश्रांती आणि ताजेतवाने होण्यासाठी प्रवास फायदेशीर ठरू शकतो. आरोग्याची काळजी घेण्यासाठी शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्याला प्राधान्य द्या.
कुंभ
तुम्हाला लव्ह लाइफमध्ये विश्वास आणि सुरक्षिततेची भावना अनुभवयला मिळेल. नातेसंबंधावर आणि प्रेमाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा. करिअरमध्ये यश मिळू शकेल. परंतु, स्वतःच्या क्षमतेवर शंका घेऊ नका. तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष करत आहात. यामुळे तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे आणि गरजांकडे लक्ष द्यावे लागेल. प्रवास करणं फायदेशीर ठरेल. प्रवासातून विश्रांती आणि नवचैतन्य मिळेल. रोजच्या कामातून विश्रांती घ्या. स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याकडे जास्त लक्ष द्या.
मीन
आज लव्ह लाइफला विशेष महत्त्व द्याल. नवीन नातेसंबंध तयार होऊ शकतील किंवा सध्याचे नातेसंबंध अधिक मजबूत होतील. याबाबत मनातल्या विचारांना प्राधान्य देत निर्णय घ्या. करिअरमध्ये, आव्हानांचा सामना करावा लागत असेल तर त्यावर मात करण्यासाठी तुम्हाला मदतही मिळेल. मनातले विचार आणि मदतीच्या बळावर तुम्हाला कामात यश मिळेल. कठीण परिस्थितीचा सामना करत असाल तर त्यावर मात करण्याची, त्यातून बाहेर पडण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे. प्रवास फायदेशीर ठरेल. परिवर्तनकारी अनुभव येईल. प्रवासात नवीन गोष्टी शिकण्याची आणि दृष्टीकोन मिळवण्याची संधी प्राप्त होईल. प्रवास एक नवीन अनुभव देणारा ठरू शकतो. तसेच काही साहसी किंवा नव्याने काही योजना तयार करण्यासाठी वेळ मिळेल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर