अमृत कलश यात्रेनिमित्त पंचायत समिती शेवगाव येथे शिक्षकांनी रेखाटली अप्रतिम रांगोळी

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
नेहरू युवा केंद्र,अहमदनगर व पंचायत समिती, शेवगाव यांच्या संयुक्त विद्यमाने माझी माती माझा देश या योजनेअंतर्गत अमृत कलश यात्रा निमित्त पंचायत समिती, शेवगाव कार्यालय प्रांगणात आबासाहेब काकडे विद्यालय, शेवगाव येथील इयत्ता 7वीच्या विद्यार्थिनींनी कलाशिक्षक शितलकुमार गोरे व सहशिक्षिका माधुरी पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली सुंदर रांगोळीचे रेखाटन केले.
साकारलेल्या रांगोळीचे सर्वच अधिकारी वर्गाने खूप भरभरून कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. यावेळी शेवगाव पंचायत समिती गटविकास अधिकारी, राजेश कदम, सहाय्यक गटविकास अधिकारी,श्रीम.दीप्ती गाट, गटशिक्षणाधिकारी श्रीम.तृप्ती कोलते, यांनी मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार केला व विद्यार्थ्यांचे चॉकलेट देऊन कौतुक केले.
यावेळी पंचायत समिती शिक्षण विभाग येथील सर्व शेवगाव मधील इतर विद्यालयाचे, महाविद्यालयाचे शिक्षक विद्यार्थी प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित.