राजूर च्या देशमुख महविद्यालयात अवयव दिन साजरा

विलास तुपे
राजूर:-आज दि.3/8/2023 रोजी भारतीय अवयव दान दिवस अँड्.एम.एन.देशमुख महाविद्यालयात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राजूर गावचे डॉक्टर रवींद्र अवसरकर हे होते. अवयव दान हे जगातील सर्वश्रेष्ठ दान असून एका व्यक्तीच्या अवयव दानाने आठ लोकांना जीवनदान मिळू शकते. त्यामुळे अवयव दानाची जनजागृती देशव्यापी व्हायास हवी असे प्रतिपादन राजूर येथील प्रख्यात डॉक्टर मा.रवींद्र अवसरकर यांनी केले. ते अँड्.एम.एन.देशमुख महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास मंडळ, राष्ट्रीय छात्र सेना, य.च.म.मुक्त विद्यापीठ नाशिक केंद्र राजूर यांच्या संयुक्त् विद्यमाने आयोजित भारतीय अवयवदान या कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.राष्ट्रीय आरोग्य अहवालानुसार दरवर्षी भारतात पाच लाख लोक अवयवांच्या अनुपलब्धतेमुळे ,बारा लाख लोक यकृयाच्या अनुपलब्धतेमुळे मरण पावतात असेही ते म्हणाले. आपण ह्रदय, यकृत, मूत्रपिंड, आतडे, डोळे, त्वचा, यांचे अवयवदान करु शकतो असेही ते म्हणाले.या कार्यक्रमात च्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी डॉ. भरत शेणकर हे होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. एल.बी.काकडे यांनी केले.व त्यांनी 135 विद्यार्थ्यांना अवयवदानाची शपथ दिली. तर आभार प्रदर्शन प्रा.बी.एच.तेलोरे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. बी. के. थोरात, विद्यार्थी विकास मंडळाचे प्रमुख डॉ. व्ही. एन. गिते, प्रा. बी. एच. तेलोरे, डॉ. आर. आर. सोनवणे, प्रा. ए. डी. सातपुते, प्रा.डॉ. द. के. गंधारे, प्रा. एन. यू. देशमुख, प्रा.सावंत सर, प्रा. जे. एस. कुसमुडे, शाम पवार, विलास लांघी इत्यादींनी सहकार्य केले.
