देवटाकळी येथील लिटल स्टार इंग्लिश स्कूल मध्ये आज स्नेहसंमेलन

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील देवटाकळी येथील साबळे बंधू यांच्या परिश्रमातून अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या लिटल स्टार इंग्लिश स्कूलमध्ये मध्ये आज दिनांक १० / ३ /२०२३ रोजी सायंकाळी ०६ वाजता शाळेच्या प्रारंगणात स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित केला आहे.वर्षभर शाळेत विविध उपक्रम व विविध सण उत्सव साजरे करून विद्यार्थ्यांना सणाची माहिती दिली जाते.याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या प्रमुख उद्देशाने शाळेने सालाबाद प्रमाणे याही वर्षी स्नेहसंमेलनाच्या आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शेवगाव सायकल क्लबचे संपूर्ण टीम उपस्थित राहणार आहेत. यावेळी होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कलाविष्कार पाहण्यासाठी व चिमुरड्यांच्या कौतुकासाठी पालकांसह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान शाळेचे सहशिक्षक योगेश साबळे मुख्याध्यापक नारायण काळे यांनी केले आहे.
लिटल स्टार इंग्लिश स्कूल मध्ये आयोजित स्नेहसंमेलमध्ये उत्कृष्ट कलाविष्कार सादर करणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.