अकोल्यात बस, फेऱ्या बंद केल्याने प्रवाशांची गैरसोय

अकोले प्रतिनिधि
अकोले या आदिवासी तालुक्यातील सर्वाधिक दुर्गम भागातील, रतनवाडी, शेनित मुक्कामी एस टी बस बंद केली. वाघापूर, देवगाव – राजूर, बलठन मुक्कामी देवगाव मार्ग जात नाही. अनेक गावच्या फेऱ्या बंद केल्या आहेत. त्या चालू करा अशी मागणी ग्राहक पंचायत अकोले शाखेने केली आहे
अकोलेचे तालुका अध्यक्ष दत्ता शेनकर , मच्छिंद्र मंडलिक, रमेश राक्षे यांनी या बाबत अकोले आगार व्यवस्थापक यांना निवेदन दिले आहे
एस टी बस सेवा अचानक बंद करण्यात आली यामुळे आदिवासी अतिदुर्गम भागातील एस टी बस वर अवलंबून असणाऱ्या विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, अपंग इत्यादी प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे.
महाराष्ट्र शासनाने ज्येष्ठ नागरिक व महिलांना प्रवासात पन्नास टक्के सवलत व ७५ वर्षा पुढील नागरिकांना मोफत प्रवास योजना सुरु केली. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण, शहरी भागातील ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना , विद्यार्थ्यांना , अपंग व्यक्तीला याचा मोठा फायदा होत आहे.
तसेच वरील गावातील येणाऱ्या जाणाऱ्या बसेस बंद असल्याने खाजगी वाहनांमध्ये प्रवास करणे हे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, अपंग व्यक्ती नागरिकांना अत्यंत धोकादायक ठरत आहे. आदिवासी दुर्गम भागातील एस टी बसेस मुक्कामी बंद झाल्यामुळे व काही गावातील एस टी बसेस च्या फेऱ्या बंद झाल्या मुळे ज्येष्ठ नागरिकांना , विद्यार्थ्यांना आर्थिक मनस्ताप होत आहे. वरील गावातील एस टी बसेस तत्काळ चालू करण्यात याव्यात असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा अकोले तालुक्यातील मच्छिंद्र मंडलिक, रमेश राक्षे, दत्ता शेनकर, गंगाराम धिंदळे, मोहन मुंढे, भाऊसाहेब वाकचौरे, राम रद्रे, दत्ता ताजणे, नरेंद्र देशमुख, रामदास पांडे, प्रकाश कोरडे, ज्ञानेश पुंडे, गणपत शेळके, गणपत थिगळे, जालिंदर बोडके, ॲड दिपक शेटे, ॲड राम भांगरे, माधव टिटमे, सुदाम मंडलिक, मच्छिंद्र चौधरी, भाऊसाहेब गोर्डे, लक्ष्मण गोडसे आदिंचे नावे आहेत.
-–/—————