कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात अनोख्या पद्धतीने आझादी का अमृत महोत्सव साजरा….

आयकर विभाग व वन विभागाचा पुढाकार
विलास तुपे
राजूर प्रतिनिधी-
कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात उडदावणे व पांजरे ह्या अतिदुर्गम दोन गावातील प्राथमिक शाळेतील एकूण 550 विद्यार्थ्यांना स्वेटर वितरण करण्यात आले.
भारत सरकार मार्फत वेग वेगळ्या विभागांना आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्या करीता निधी देण्यात येत आहे. आयकर विभाग मुंबई ह्यांना मिळालेल्या निधीमधून सदर कार्यक्रम हाती घेण्यात आला.
आयकर विभागाचे अतिरिक्त आयुक्त भरत आंधळे ह्यांच्या पुढाकाराने सदर कार्यक्रम वनविभागाच्या सौजन्याने राबविण्यात आला.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना ऐन थंडीच्या वेळी स्वेटर मिळाल्यामुळे सर्व ग्राम वासीयांनी व विद्यार्थ्यांनी आयकर विभाग व वन विभाग ह्यांचे आभार मानले आहेत.

उडदावणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या 216 विद्यार्थ्यांना व पांजरे येथील नूतन महाविद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांजरे येथील 324 विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप करण्यात आले. स्थानिक शाळातील कार्यक्रम राबविण्याकरिता वनविभागातील उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे , यांच्या मार्गदर्शनात गणेश रणदिवे, सहाय्यक वनसंरक्षक, अमोल आडे , वनपरिक्षेत्र अधिकारी भंडारदरा ह्यांनी सहभाग घेऊन कार्यक्रम पार पाडला.

इतक्या दुर्गम आदिवासी बहुल क्षेत्रात अश्या अनोख्या प्रकारे आझादी चा अमृत महोत्सव साजरा केल्यामुळे सर्वत्र भारत सरकार, आयकर विभाग व वनविभागाचे कौतुक देखील होत आहे.

ह्यामुळे विद्यार्थ्यांना नवीन प्रेरणा व ऊर्जा मिळणार आहे असे मत शाळेतील शिक्षकानी व्यक्त केले.यावेळी मुख्याध्यापक उकिर्डे संजय शेळके अर्जुन वाळे रघुनाथ, हासे सोमनाथ, सोनवणे साईनाथ, खानेकर दिनकर, श्रीमती जाधव अर्चना, मधे मंगल, कांबळे सुवर्णा आदी उपस्थित होते
