खरवंडी कासार येथे छञपती शिवाजी महारांज जयंती साजरी !

अशोक आव्हाड
:पाथर्डी प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथे छञपती शिवाजी महारांजाची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली
यावेळी खरवंडी येथील वेशी च्या किल्ल्यावर शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करूण प्रतिमेचे पूजन करण्यात आले
यावेळी खरवंडी परिसरातील शिवप्रेमीनी जय भवानी जय शिवाजी जय घोषणा देत शिवाजी महाराजांच्या आठवणींना उजाळा दिला या वेळी शिवसेना तालुका प्रमुख अमोल भैय्या जायभाये, शिवसेना शहराध्यक्ष दिलीप अनुसे ,संदिप देशमुख, किरण अंदुरे, तरुण तडफदार नेते विशाल कोळपकर, संतोष ढगे, अनिल जवरे, दिलीप जवरे, पप्पू केकान , महादेव जगताप महेश आंदुरे, शुभम जगताप व सर्व शिव सैनिक व शिवभक्त उपस्थित होते शिवप्रेमींसाठी संध्याकाळी ६वाजता भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात आली व मिरवणुकीसाठी परिसरातील सर्व शिवप्रेमींनी उपस्थिती दर्शवली