इतर

सभापती काशिनाथ दाते यांना पितृशोक

दत्ता ठुबे

पारनेर प्रतिनिधी

जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती माजी सभापती काशिनाथ दाते सर यांचे वडील महादू नारायण दाते यांचे शनिवार दिनांक १७ डिसेंबर २०२२ रोजी नगर येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान रात्री ८.४८ वा. निधन झाले ते १०२ वर्षांचे होते.

पारनेर शहरातील स्मशानभूमीत रविवारी सकाळी महादू दाते यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सभापती काशिनाथ दाते सर यांच्या पारनेर शहरातील संभाजीनगर येथील निवासस्थानापासून अंत्ययात्रेस सुरुवात झाली. फुलांनी सजवलेल्या वाहनात महादू दाते यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. अंत्ययात्रेदरम्यान महादू दाते यांचे पार्थिवावर पुष्पवृष्टी करण्यात येत होती. पारनेर तालुक्यातील कन्हेर येथे आती दुर्गम भागात शेतकरी कुटुंबात जन्मलेले महादू दाते यांचे सहा भावंडांचे कुटुंब! महादू दाते सर्वात थोरले असून अतिशय काबाडकष्ट करून उदरनिर्वाह करणे ठरलेले होते. कै.मारुती दाते, कै. लक्ष्मण दाते, कै गोविंद दाते, राधु दाते, गोपीनाथ दाते अशा भावंडांचे त्यांचे कुटुंब होते. महादू नारायण दाते यांना सहा मुले व एक मुलगी असा परिवार सभापती काशिनाथ दाते सर हे सर्वांत ज्येष्ठ असून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत दाते सरांनी शिक्षण घेतले. शिक्षण घेत असताना आपल्या भावंडांची जबाबदारी स्वतःवर घेऊन शिक्षण पूर्ण केल्यानंतर पारनेर शहरात दाते टायपिंग इन्स्टिट्यूट सुरू केले. सुरुवातीपासून समाजकारण आणि राजकारणाची त्यांना आवड आपल्या मुलाची समाजकारण व राजकारणात उंची पाहून कै. महादू दाते यांना कायमच अभिमान वाटून आनंद होत असे. अहमदनगर जिल्ह्यात चारित्र्यवान आणि संयमी नेता म्हणून आज सभापती दाते सर यांची ओळख निर्माण झालेली आहे. त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. महादू नारायण दाते यांना काशिनाथ दाते सर, गोरख, गणपत, सुभाष, बाबासाहेब आणि मुलगी सीताबाई रोहोकले असा परिवार आहे. सर्व कुटुंब शेती तसेच व्यवसायात आहेत. बाबांचे नातू दिलीप शेठ दाते व मंगेश शेठ दाते यांनी पेट्रोल पंप व्यवसायात नावलौकिक मिळवला असून डॉ. प्रदीप दाते यांचे हॉस्पिटल आहे व ते परिसरातील युवकांच्या सुखदुःखात सहभागी होतात.

: स्वर्गीय महादू दाते यांचे धाकटे भाऊ बाबाजी दाते यांचे वडील मारुती नारायण दाते यांचे शुक्रवारी वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले. त्यांचा अंत्यसंस्कार झालेल्या दिवसाच्या रात्रीच ज्येष्ठ बंधूंनी इहलोकीचा निरोप घेतला. लागोपाठ घडलेल्या दोन घटनांमुळे दाते कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अंत्यविधीस मोठ्या संख्येने तालुक्यातील नागरिक सहभागी झाले होते माजी आमदार विजयराव औटी, आमदार निलेश लंके, भाजप तालुकाप्रमुख वसंत चेडे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले, सभापती गणेश शेळके, महिला आघाडी प्रमुख प्रियंका खिलारी, नगराध्यक्ष विजय औटी, माजी सभापती गंगाराम बेलकर, जल व्यवस्थापन समिती सदस्य राहुल पाटील शिंदे, ॶॅड पांडुरंग गायकवाड, अशोक कटारिया, चंद्रकांत चेडे, वसंत पवार, माजी सरपंच सुरेश बोरुडे, शिवाजी खिलारी, नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक, सुखाशेठ पवार, सुनील पवार, विविध गावचे सरपंच, सोसायटी चेअरमन यांच्यासह तालुक्यातून हजारो संख्येने नागरिक उपस्थितीत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button