आदिवासी क्रांतिकारकांच्या बलीदानातुनच आदिवासींची चळवळ..! —श्री.नरहरी इदे

विलास तुपे
राजूर प्रतिनिधी
-आदिवासीचे जीवन निसर्ग, दुखः, वेदना, सौंदर्य यामुळे नागरी जीवनापेक्षा वेगळी संवेदना देणारी असून त्याला कष्टकरी जीवनाची किनार लाभली आहे. कष्टमय जीवनात देखील आनंदमय जीवन व्यथित करणारी ही इथल्या मातीची संस्कृती.व परंपरा आहे.असे प्रतिपादन मुतखेल ता.अकोले येथे नऊ ऑगस्ट रोजी आयोजित आदिवासी दिन कार्यक्रमात श्री.नरहरी इदे यांनी आपल्या प्रमुख भाषणात प्रतिपादन केले.
जागतिक आदिवासी दिन कार्यक्रमासाठी सरपंच श्रीम. रूख्मिनी इदे, नरहरी इदे,राजेंद्र इदे,अशोक भांगरे,युवराज इदे,सोमनाथ रोंगटे, दत्तात्रय इदे,लक्ष्मण बुळे, विजय इदे,एकनाथ भांगरे, योगेश शिंदे, डाॅ.सुरभया,कदम सिस्टर, अशोक इदे,यादव इदे,बाळासाहेब भोईर हे मान्यवर ऊपस्थित होते.
आपल्या प्रमुख भाषणात श्री.इदे पुढे म्हणाले की,आदिवासींची संस्कृती त्यांचे जीवन कला, इतिहास आणि परंपरा यांचे भान आजच्या माणसाने ठेवले पाहिजे. आदिवासी समाजाला आज आपल्या सर्वांगीण विकासाऐवजी आपली बोली, संस्कृती, समूहजीवन, मुल्य, परंपरा स्वभाव इत्यादींच्या अस्तित्वासाठी झगडावे लागत आहे म्हणून ९ ऑगष्ट जागतिक आदिवासी दिनाचे औवचीत्य साधून सर्व समाज बांधवांनी आदिवासींची सांस्कृतिक अस्मिता जपणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आपल्या भाषणात शेवटी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष व शाळेचे मुख्याध्यापक श्री.आदिनाथ सुतार आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की,चार्वक बुद्धाच्या भूमीतील विद्रोही प्रेरणेतून पूज्य ठक्कर बप्पा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रबोधनाच्या चळवळी सामाजिक व सांस्कृतिक उत्थानास प्रेरणादायी ठरल्या, महात्मा फुले यांच्यासह अनेक क्रांतिकारकांनी प्रेरणा घेऊन क्रांती उभारली तेव्हा कुठे दलित, पिडीत, आदिवासी उत्थानाच्या शक्यता या देशात निर्माण झाल्या आदिवासींनी केलेला पराक्रम त्यांचा, त्याग, समर्पण, विराता आणि प्रचंड औदार्य या गोष्टी मुख्य प्रवाहातल्या अभ्यासकांनी दडपून टाकल्या आहेत त्यांचे स्मरण आजच्या दिनी होणे होणे गरजेचे आहे, क्रांतिवीर बिरसा मुंढा, क्रांतिवीर तंट्या भिल्ल, राणी दुर्गावती, राघोजी भांगरे, तिलका मांझी, वीर बाबुराव शेडमाके, रमा दादा कोलाम, क्रांतीवीर सिंध संथाल यांच्यासारख्या हजारो क्रांतिकारकांनी जुलुमी सावकार, निजामशाही व इंग्रजांविरुद्ध बंड पुकारून आदिवासींचा लढा उभा केला या क्रांतिकारकांच्या प्रेरणेतूनच आदिवासी युवक शिक्षण घेऊ लागला शिक्षणातून त्याला आत्मभान आले असल्याचे प्रतिपादन शेेवटी सुतार यांनी केले.
कार्यक्रमात प्रथम आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमा पूजना नंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात आदिवासी जनजागृती रॅली, आदिवासी संस्कृती दर्शन सांस्कृतिक कार्यक्रम, भाषणे,रांगोळी प्रदर्शन संपन्न झाले.
कार्यक्रमांसाठी जनार्धन मगर,सुजाता झेंडे,प्रगती ढगे,मंगल साळवे, मंगला काकडे,जगदीश बेळगे,गणेश बुळे, रंजित बागुल यांनी विशेष परिश्रम घेतले.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रहंस जाधव यांनी केले, प्रास्ताविक पंकज दुर्गुडे व शेवटी आभार बाबासाहेब लोंढे यांनी मानले.
कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील गावातील विविध मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने ऊपस्थित होते.कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग उस्फूर्त होता.