नाशिक ला भारतीय बौद्ध महासभेची एकदिवसीय कार्यशाळा आयोजन

नाशिक प्रतिनिधी/ डॉ. शाम जाधव
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्हा जनरल कमिटी व नाशिक जिल्हा महिला कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आज शनिवार दिनांक १ मार्च २०२५ रोजी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन राष्ट्रिय प्रमुख समन्वयक आयु. राहुल शेंडे साहेब यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आयु अरूणा ताई इंगळे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष महिला विभाग आयु सुरेखा ताई महिरे व महाराष्ट्र राज्य महासचिव आयु शुभांगी ताई डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

अतिशय मार्मिक, तंतोतंत व शिस्तबद्ध पध्दतीने नाशिक जिल्हा कमिटी, नाशिक जिल्हा महिला कमिटी नाशिक तालुका कमिटी, नाशिक तालुका महिला कमिटी व सिन्नर तालुका कमिटी च्या पदाधिकारी यांनी आजच्या प्रशिक्षण शिबिराचा आयु. राहुल शेंडे व आयु. अरूणा ताई इंगळे यांच्या कडून अनुभव घेतला. दोन्ही पदाधिकारी यांनी उपस्थित सर्व पदाधिकारी यांचे शंकांचे व्यवस्थित रित्या निरासरन केले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाशिक जिल्हा सह सचिव आयु. अविनाश गांगुर्डे यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नाशिक जिल्हा उपाध्यक्ष आयु तुषार गोरे यांनी केले.