जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात संपन्न

विलास तुपे
राजूर /प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील केळुगण येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला
सकाळी आठ वाजता विदयालयातून केळुंगण गावापर्यंत प्रभात फेरी काढण्यात आली. गावातील हनुमान मंदिरात सर्व विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थ एकत्रित झाले त्याठिकाणी सरपंच युवराज देशमुख, जेष्ठ नागरिक भारमल दादा, शंकर दादा ,आर.टी.देशमुख साहेब व मनोहर भांगरे सर व इतर सर्वांचे हस्ते क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचे प्रतिमा पूजन करण्यात आले .त्या ठिकाणी विद्यार्थींचे सांस्कृतिक कार्यक्रम झाले.

नंतर विद्यालयात सर्व विद्यार्थी व ग्रामस्थांना एकत्रित करून क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचे फोटो चे प्रतिमा पुजन झाले विद्यार्थ्यांची भाषणे व आदिवासी गीते सादर करण्यात आली. ग्रामस्थांनी ,महिला भगिंनी नी उस्फुर्त सहभाग घेतला.या सर्व कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान जेष्ठ नागरिक मा.शंकर दादा देशमुख यांनी भुषविले. हा सर्व कार्यक्रम संपन्न होणेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख बेद्रे सर व बोंबले सर यांनी सुंदर नियोजन केले इतर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. मुख्याध्यापक श्री. लांडगे पांडुरंग यशवंत, श्री. बेद्रे पी. ए.,, श्री. राहणे आर. वाय., श्री. जाधव आर. ए., श्री. पोखरकर बी. डी., श्री. सातपुते. व्ही. एल., श्री. बोंबले आर. एन., श्रीमती. नवले व्ही. व्ही, श्री. सुपे जे. एम, श्री. धिंदळे जी. एम. सूत्रसंचालन श्री. जाधव एन.