इतर

केंद्रीय राज्यमंत्री ना.प्रल्हादसिंह पटेल अकोले च्या दौऱ्यावर
विविध कार्यक्रमाचे नियोजन

अकोले प्रतिनिधी-

केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग व जलशक्ती राज्यमंत्री हे अकोले विधानसभा मतदार संघ दौऱ्यावर येत असून शेतकरी, महिला व दुर्बल घटकातील नागरीक व आदिवासी समाज सोबत संवाद साधणार असल्याची माहिती भाजप तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे यांनी दिली.
केंद्रीय मंत्री लोकसभा प्रवास योजनेनुसार तीन दिवस शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे दौऱ्यावर ना.पटेल येत असून अकोले तालुक्यात एक दिवस प्रवास करणार आहे. या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचेभाजपचे जेष्ठ नेते तथा माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड, महसुल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय मंत्री मा.आमदार वैभवराव पिचड, प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर, योजना प्रभारी आ.राहुल आहेर, प्रदेश कार्यालय प्रमुख रवीजी अनासपुरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, माजी आमदार चंद्रशेखर कदम, स्नेहलता ताई कोल्हे,बाळासाहेब मुरकुटे, नितीन दिनकर, जिल्हा परिषद गटनेते जालिंदर वाकचौरे, शिवाजीराजे धुमाळ,गिरजाजी जाधव, सुनील वाणी, सुभाष वहाडणे,अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.अविनाश भोसले,प्रांताधिकारी डॉ.शशिकांत मंगरुळे,तहसीलदार सतीश थिटे,.गटविकास अधिकारी शेळके तसेच इतर विभागाचे शासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
ना.प्रल्हाद पटेल सोमवारी सकाळी ठीक 9 वाजता कुंभेफळ ग्रामपंचायत कार्यालय भेट व केंद्रीय योजना चा आढाव व शेतकऱ्यांसी संवाद जनजाती कल्याण आश्रम व अगस्ती ऋषी आश्रम येथे दर्शन व भाविक संवाद साधणार आहेत.

अकोले महाविद्यालयाच्या के.बी दादा सभागृह येथे महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सोनाली नाईकवाडी यांनी आयोजित केलेल्या महिला पदाधिकारी मेळाव्यात ते मार्गदर्शन करणार आहेत. अकोले येथील प्राचीन मंदिर असलेल्या सिद्धेश्वर मंदीरास भेट देणार आहेत. नंतर देवठाण दुर्बल घटक व आदिवासी समाजातील व्यक्ती बरोबर सवांद व भोजन करून संगमनेर कडे प्रस्थान करणार आहेत
तरी या कार्यक्रमास सर्वानी उपस्थित राहावे असे आवाहन सरचिटणीस यशवंतराव आभाळे, भाऊसाहेब वाकचौरे, मच्छिंद्र मंडलिक, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष राहुल देशमुख, अमृतसागर चे व्हा चेअरमन रावसाहेब वाकचौरे, नगराध्यक्ष तथा भाजप जिल्हा महिला अध्यक्ष सौ.सोनाली ताई नाईकवाडी, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनिल दातीर, सेक्रेटरी सुधाकर देशमुख,अगस्ती देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष ऍड.के.डी. धुमाळ, विश्वस्त दीपक महाराज देशमुख,राजेंद्र नवले महाराज, पंचायत समिती माजी सदस्य अरुण शेळके, सुभाष काकड, श्रीकांत सहाणे, केशव बोडके,बाळासाहेब मुळे, रामदास सोनवणे, प्राचार्य संतोष कचरे,अमोल कोटकर, सुनील कोटकरमहिला तालुकाध्यक्ष सौ.रेश्मा गोडसे, शहराध्यक्ष सौ.अंजली सोमनी, लक्ष्मीबाई शिंदे हे परिश्रम घेत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button