दोघांची माघार,शिर्डी लोकसभेच्या आखाड्यात आता 20 उमेदवार!
भाऊसाहेब वाकचौरे -सदाशिव लोखंडे लढत रंगणार!
शिर्डी प्रतिनिधी
शिर्डी लोकसभा मतदार संघात छाननी नंतर २२ उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज वैध ठरले होते. आज, सोमवारी माघारीच्या अंतिम मुदतीत २ उमेदवारांनी माघार घेतली आहे.यात सना मोहंमद अली सय्यद (अपक्ष) व संजय हरिश्चंद्र खामकर (बळीराजा पार्टी) या उमेदवारांनी माघार घेतली आहे. शिर्डी लोकसभा निवडणूक रिंगणात आता २० उमेदवार आहेत.
निवडणूक प्रक्रिया निर्भय आणि मुक्त
वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक
लढविणाऱ्या उमेदवारांनी प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन शिर्डी लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक अजय कुमार बिष्ट यांनी आज येथे
केले.
राहाता येथील निवडणूक निर्णय अधिकारी
कार्यालयातील सभागृहात अपक्षउमेदवारांना चिन्हवाटप, आचारसंहिता व खर्चाबाबत मार्गदर्शन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उमेदवारांना मार्गदर्शन करतांना श्री. बिष्ट बोलत होते.
यावेळी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर, सहायक निवडणूक निर्णय
अधिकारी माणिक आहेर आदी उपस्थित होते.
श्री. बिष्ट म्हणाले की, निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करत निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी उमेदवारांनी प्रशासनाला सहकार्य करावे. असे आवाहन यावेळी श्री बिट यांनी केले
निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी निवडणूक आयोगाच्या नियमानुसार अपक्ष उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले. एकाच चिन्हांसाठी पसंती दिल्या एक पेक्षा जास्त उमेदवारांच्या चिन्हांचे चिठ्ठीद्वारे सोडत काढून वाटप
करण्यात आले.
यावेळी उपजिल्हाधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांनी निवडणूक आचार संहितेविषयी मार्गदर्शन केले.उमेदवारांना वेळोवेळी खर्च सादर करावा लागेल नोडल अधिकारी (खर्च) सदाशिव पाटील यांनी निवडणूक खर्चाविषयी उमेदवारांना यावेळी मार्गदर्शन केले. शिर्डी लोकसभेची उमेदवारी करणाऱ्या उमेदवारांना त्यांची दैंनदिन नोंदवही संपूर्ण प्रचार कार्यकाळात किमान तीन वेळा खर्च निरीक्षकासमोर सादर करणे आवश्यक आहे. शिर्डी लोकसभेतील उमेदवारांच्या खर्च लेख्यांची तपासणी ३ मे, ७ मे व ११ मे या तारखेला राहाता उप कोषगार अधिकारी कार्यालयात केली जाणार आहे. या तारखांना सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी त्यांचे दैंनदिन खर्च नोंदवह्यासह उपस्थित राहावे. असे आवाहन श्री. पाटील यांनी केले
भाऊसाहेब राजाराम वाकचौरे (शिवसेना
बाळासाहेब ठाकरे),
रामचंद्र नामदेव जाधव ( बहुजन
समाज पार्टी),
लोखंडे सदाशिव किसन (शिवसेना),
उत्कर्षा प्रेमानंद रूपवते ( वंचित बहुजन आघाडी),
अॅङ नितीन दादाहरी पोळ ( बहुजन भारत पार्टी),
भारत संभाजी भोसले (समता पार्टी),
राजेंद्र रत्नाकर वाघमारे
(राष्ट्रीय जनक्रांती पार्टी),
अभिजीत अशोकराव पोटे
(अपक्ष),
अशोक रामचंद्र आल्हाट (जनहित लोकशाही
पार्टी),
खरात नचिकेत रघुनाथ (अपक्ष),
खाजेकर विजयकुमार गोविंदराव (अपक्ष), गंगाधर राजाराम कदम (अपक्ष),
चंद्रकांत संभाजी दोंदे (अपक्ष),
प्रशांत वसंत निकम (अपक्ष),
बागुल गोरक्ष तान्हाजी (अपक्ष),
भाऊसाहेब रामनाथ वाकचौरे (अपक्ष),
रविंद्र कलय्या स्वामी (अपक्ष),
सतिष भिवा पवार (अपक्ष),
अॅड. सिध्दार्थ दिपक बोधक (अपक्ष)
व संजय पोपट भालेराव (अपक्ष) असे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.