इतर

गगनगिरी महाराज सप्ताहात इंदुरीकर महाराजांचा तोल गेला! मीडियावर घसरले !


{ भारत रेघाटे }
कोणत्या ना कोणत्या कारणाने आणि विषयावर वादग्रस्त वक्तव्य करण्याची सवय इंदुरीकर यांना जडली आहे. वक्तव्यातून आपला तोल सावरण्यात पटाईत असलेले परंतु जिभेला काबूत न ठेवणारे व चुकून कधी तरी सावरण्यात कमी पडणारे इंदुरीकर शेवटी जे नाही बोलायचे ते बोलून गेलेच आणि पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकले. एका धार्मिक कार्यक्रमात
आवरा तुमचं चम्बु गबाळे असे म्हणत तमाम पत्रकारांचा अपमान केला यावर कडक निषेध नोंदवून अनेक पत्रकार एकत्र येणार असल्याचे बोलले जाते.
सार्वजनिक मंचावर समाज प्रबोधन करत असताना प्रबोधनकार तद्वतच समाज हितेषी, मार्गदर्शक यांनी व्यक्तिस्वातंत्र्याचा अधिकार बाळगावा, तो साधर्म्य जपत अभिव्यक्त ही व्हावे हा प्रघात आहे. अत्यंत नम्र , विनयशील शब्दातून समाज प्रबोधनाचे दाखले द्यावेत. मार्गदर्शन हे दिशादर्शक व्हावे ही अपेक्षा असते. सवंग लोकप्रियतेच्या नावाखाली स्वतःची हेकेखोरी करीत मिरवणारे ह.प.भ. इंदुरीकर (गर्दीकर) महाराज यांनी विश्वविभूषित परमपूज्य गगनगिरी महाराज यांच्या काल्याचे कीर्तन आणि सप्ताहाचा समारोप प्रसंगी आपला ज्ञानव्यापी असलेला मेंदू हा दर्शनी भागातून प्रदर्शनी करणारा ठरवत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. प्रसार माध्यमावर उगाच आगपाखड करण्याचे धारिष्ट इंदुरीकर कसे करू शकता? हिमालयाला गवसणी घालणारा असा हा सप्ताह पार पडला परंतु
निवृत्ती इंदुरीकर (प्रवृत्ती गर्दीकरचा) तोल बिथरला; मीडियाने तो सम-तोल सावरला
याबाबतही पत्रकारांनी समाचार घेणे संयुक्त ठरणार नाही का ? इंदुरीकर यांना व्हिडिओ आणि रेकॉर्डिंगचे वावडे असल्याचे समजते. असे असेल तर त्यांनी सार्वजनिक मंचावर, प्रसार माध्यमांसमोर येणे टाळावे अथवा बंदच करावे. आपल्या स्व-व्यक्तिगत
कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी प्रबोधन करावे. मीडियावर आपला प्रभाव आणि हक्क दाखवण्याचा उगाच अट्टहास आणि तो गृहीत धरण्याचा अधिकार भविष्यातही कोणासही मिळणार नाही हे लक्षात असू द्यावे. काल जाखुरी येथे इंदुरीकर महाराज यांनी समाज प्रबोधन केले का ? हा एक प्रश्नचिन्हच आहे. मनोमन आता असे वाटायला लागले की, खरंच गर्दीकर म.यांनी निवृत्ती घ्यावी. झाले, गेले, केलेले प्रबोधन कृष्णार्पणमस्तु करावे. त्यांचे प्रबोधन हे समाज विधायक आहे की समाज घातक आहे हे समाज ठरवेल. आपल्या अंगी असलेला वाक्चातुर्याचा तोरा अततायीपणा, अतिरेकीपणा हा संयम बाळगत संबोधीत करणारा असावा ही माफक अपेक्षा. ‘विद्या ही विनयाने शोभते’ किंबहुना ‘ज्ञानं परम व्रतम’
हा दाखला महाराजांनी आत्मसात करावा. जाखुरीच्या कार्यक्रमांमध्ये गर्दीकर महाराजांची ही वृत्ती प्रकट झाली आणि माध्यमांच्या प्रतिनिधींवर शाब्दिक आग ओकली. हे एकदा नव्हे तर कार्यक्रमाच्या दरम्यान कमीत कमी दोन ते तीन वेळ गर्दीकर महाराज सवयीप्रमाणे तोल न सावरत घसरले. सवंग ज्ञानाची सवय असलेले उच्चशिक्षित इंदुरीकर यांना तंत्रज्ञानाचे महत्त्व , ज्ञान अवगत नसल्याचे यातून दिसून आले. ज्ञानामध्ये व्यक्त होता येतं, परंतु तंत्रज्ञानामध्ये व्यक्त होण्याचे संकेत महाराजांना कोण बरे सांगेल ? हे सांगणे कोण्या ये-या ग-बाळ्याचे काम तर नक्कीच नव्हे.
…… सार्वजनिक मंचावर प्रबोधन करत असताना माझी परवानगी घेतली का ? असा प्रश्नार्थक सवाल इंदुरीकर (गर्दीकर) महाराज करूच कसे शकतात ? अनेक ठिकाणी होणाऱ्या
कार्यक्रमाचे लाखो रूपयाचे पॅकेज नामांकित चॅनेलच्या माध्यमातून गर्दीकर महाराजांना चालतेच कसे असा सवालही या ठिकाणी उपस्थित होतो.
…. सप्ताहाच्या कार्यक्रमाचे आमंत्रण, निमंत्रण आयोजकाकडून तमाम भक्तगण, मीडिया, आणि इंदुरीकर म. यांना होते. मग मीडिया बाबत इंदुरीकर हे दुजाभावाचे वक्तव्य कसे करू पाहता. प्रिन्ट, इलेक्ट्रॉनिक आदि मीडियाच्या माध्यमातून सदर दैवी सप्ताहाचा प्रसार, प्रचाराचे प्रसारण झाले. मीडियाचे इंदुरीकरांना एवढेच वावडे असेल तर धृतराष्ट्रा सारखे एखाद्या संजयाला जवळ घेऊन सप्ताहाचे अवलोकन करायला काय हरकत होते. किंबहुना आयोजकांना
यापुढे याबाबत कल्पना द्यावी ज्या ठिकाणी मीडिया येतो त्या ठिकाणी मी येणार नाही. किंबहुना याबाबत इंदुरीकर यांनी प्रसार माध्यमाची जाहीर माफी मागावी. बहुदा व्यासपीठा
समोर प्रसार माध्यमांची बैठक व्यवस्था केलेली असते. बऱ्यापैकी माध्यमांना आयोजकांकडून गृहीत धरल्या जाते. तद्वतच आहे त्याच ठिकाणी प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी समाजासाठी आपापल्या परीने प्रतिनिधित्व करीत असतात याचे भान इंदुरीकर यांना नसल्याचे सहहेतूक जाणवले. ‘ज्ञानं परम दैवतं’ हे ज्ञात असतांना निवृत्ती सारख्यांनी ज्ञानाचा ठेभा मिरवत ज्ञानाचे दाखले द्यावेत का ? आपल्यातील वाक्चातुर्याचे अज्ञानच यातून प्रखरतेने दिसून येते. तत्क्षणी यासंदर्भात दखल घेण्याचे मी धारिष्टही केले होते. परंतु संयम आणि समय सूचकता ही नजरे समोर आल्याने स्तब्धता हेच प्रमाण मानून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. खरंतर गगनचुंबी भरारी घेणारा एवढा मोठा कार्यक्रम झाला. परंतु इंदुरीकर यांची ज्ञानगिरी आपलेच पाढे गिरवी, मिरवी, आणि प्रेक्षकांची जिरवी. हे इंदुरीकरांच्या ध्यानात का येत नाही हीच एक खरी सामाजिक शोकांतिका म्हणावी लागेल. अनेक साधू, संत, महंत, प्रबोधनकार हे रसिक श्रोते आणि प्रेक्षकांसमोर येत असताना विनयशील होत प्रभाव टाकत असतात. परंतु इंदुरीकर महाराज यांचे ज्ञानपीपासूचे जोखड बळजबरीने मानगुटीवर बसविण्याचे दिसून आले.
:- भारत रेघाटे 9822961570

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button