धामणगाव पाट येथे खंडोबा यात्रा उत्सव; विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन!

कोतुळ प्रतिनिधी
धामणगाव पाट (ता अकोले) येथे सालाबादप्रमाणे जय मल्हार प्रतिष्ठानच्या वतीने श्री खंडोबा यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे
जय मल्हार प्रतिष्ठानचे संस्थापक कैलास राऊत मामा यांच्या मार्गदर्शना खाली यात्रा उत्सवात महाप्रसाद, कुस्त्यांचा आखाडा मैदान, पालखी सोहळा आणि विविध पारंपरिक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात या सोहळ्यामुळे गावात भक्तिमय वातावरण निर्माण होते यावेळी श्री खंडोबा महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते या सोहळ्या ची जय्यत तयारी करण्यात आली असल्याचे उत्सव सोहळा समितीचे पदाधिकारी यांनी सांगितले

धामणगाव पाट येथे सोमवार (दि १० )पासून श्री खंडोबा यात्रा उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे
सोमवार दि.१०/०२/२०२५ रोजी दुपारी ४ वा. विश्वकर्मा प्रतिमेची भव्य मिरवणुक होणार आहे रात्री.८ वा महाप्रसादाचे आयोजन केले आहे
मंगळवार दि.११/०२/२०२५ रोजी दु ५ ते .८ वा. भंडारा उत्सव व महाप्रसाद होणार आहे तर रात्री ९ वा मंगला बनसोडे यांचा लोकनाट्य तमाशाचा मनोरंजन करमणुकीचा कार्यक्रम होणार आहे
बुधवार दि.१२/०२/२०२५ पहाटे ५ वा. महापुजा व अभिषेक पहाटे . महाआरती सकाळी ८वा. काठी व मुखवटा ची भव्य मिरवणूक होणार आहे रात्री ७ ते ९ वा. तळी भंडारा कार्यक्रम व. फटाक्यांची भव्य दिव्य आतिषबाजी होणार आहे
रात्री ९. वा. धुमाकूळ बारामती हा ऑर्केस्ट्रा चा कार्यक्रम होईल तर गुरुवार दि.१३/०२/२०२५
सकाळी ९ वा. कुस्तीचा जंगी हंगामा होणार आहे व रात्री ९ वाजता नखरेल नारी पुणे हा ऑर्केस्ट्रा होणार आहे
परिसरातील भाविकांनी या यात्रा उत्सवात सहभागी होऊन या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन धामणगाव पाट ग्रामस्थ व उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे