महर्षी मार्कंडेय महामुनी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी

.
सोलापूर : काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाने लिंगायत वडार गुरव या समाजासाठी आर्थिक महामंडळे स्थापन करून त्यांना किमान 50 कोटी निधी देण्याची घोषणा केली. पद्मशाली समाज केवळ सोलापुरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात देखील मोठ्या संख्येने आहेत. परंतु आजपर्यंत या समाजाला कोणत्याही स्वरूपात विकास होण्यासाठी शासनाकडून कोणतेही महत्त्व दिले गेले नाही. वीरशैव लिंगायत, वडार, रामोशी, गुरव समाजासाठी जसे आर्थिक महामंडळ स्थापन केले गेले त्याचधर्तीवर पद्मशाली समाजाला सुद्धा महर्षी मार्कंडेय महामुनी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून मिळावे या संदर्भात श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर कोंडा यांच्या पुढाकारातून रविवार दिनांक २० ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सोलापूरातील दाजी पेठेतील श्रीराम मंदिर येथे समाज बांधवांची बैठक बोलावली होती.
या बैठकीत समाजातील गरीब गरजू घटक अत्यंत खडतर अवस्थेत असून त्यांना सुस्थितीत आणून त्यांचा आर्थिक विकास करणेसाठी आर्थिक महामंडळाशिवाय पर्याय नाही ह्या भूमिकेवर एकमत होऊन समाजबांधवांनी आपली मते व्यक्त करताना विविध भागात असलेल्या समाजाला महामंडळाबाबत जागृती करावी, सह्यांची मोहिम राबवावी, स्टीकर, पँम्पलेटद्वारा समाजातील सर्व घटकापर्यंत माहिती पोहचवावी. समाजातील सर्व संघटनांना एकत्रित करुन समाजाची एकता व ताकद निर्माण करुन शासनास निवेदन, आंदोलन माध्यमातून महामंडळ देण्यासाठी भाग पाडावे, कोणत्याही परिस्थितीत मागे न हटता समाजाच्या विकासासाठी संघर्ष करण्याचीसुध्दा तयारी ठेवावी अशी भूमिका मांडली.
या बैठकीत श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर कोंडा, प्रा. विठ्ठल वंगा, निवृत्त पोलीस निरीक्षक बाबू गंधमल, गणेश पेनगोंडा, सुकुमार सिध्दम,गोपी कृष्ण वड्डेपल्ली, मधुकर कमटम, अमरनाथ सामल, श्रीनिवास रच्चा, वैकुंठम जडल, लक्ष्मीनारायण दासरी, अरविंद बोल्लू, यशोधन यलगम, महेश बिंगी, विक्रम पिस्के, लक्ष्मण भंडारी, हरिदास बोड्डू, वासुदेव लगशेट्टी, व्यंकटेश बुधारम सखी संघमच्या अध्यक्षा ममता मुदगुंडी यांच्यासह आदींची उपस्थिती होते. बैठकीचे समालोचन व्यंकटेश रच्चा यांनी केले तर समारोप, नागेश सरगम यांनी आभार मानले.