अकोल्यात शिरपुंजे येथे रानभाजी महोत्सव साजरा.

अकोले/प्रतिनिधी-
लोकांमध्ये रानभाज्या बाबत ओळख निर्माण व्हावी.तसेच आरोग्य विषयक महत्त्व व जागृती करण्यासाठी अकोले तालुक्यातील अतिदुर्गम भागातील शिरपुंजे येथे रानभाजी मोहत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.सदर रानभाजी महोत्सव वाटर संस्थेने आयोजित केला होता. या महोत्सवाला परिसरातुन प्रचंड प्रतिसाद मिळाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वन विभागाचे धोंडे साहेब उपस्थित होते.
रानभाजी मध्ये चाईची भाजी, रताळ्याची भाजी, कोरडची भाजी, लालमाठ, तेर्याची भाजी, पोखरीची भाजी, मोहरीची भाजी, राजगिऱ्याची भाजी, चित्रकाची भाजी, शेवगा आवळा, उंबर कोंबड्याची भाजी, खुरसणीची भाजी यांसारख्या रानभाज्या होत्या. सदर कार्यक्रमासाठी वॉटर संस्थेचे बाळासाहेब भांगरे, वैभव लासुरे, देवेन्द्र तांबे, रामनाथ भांगरे, योगिता हासे तसेच गावातील सरपंच, ग्रामसेवक, पाणलोट क्षेत्र कमिटी सदस्य, बचत गटातील महिला, ग्रामस्थ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील विद्यार्थी व शिक्षक यांच्या उपस्थितीमध्ये आजचा कार्यक्रम घेण्यात आला.

याप्रसंगि कार्यक्रमाचे अध्यक्ष वनविभागाचे धोंडे साहेब यांनी सेंद्रिय भाज्या सेवन केल्यामुळे कोरोना सारख्या भयंकर आजारापासुन ग्रामीण खेडेगावातील लोकांना दिलासा मिळाला.रानातील भाज्या खाल्ल्यामुळे प्रतिकारक्षमता चांगली तयार होऊन कोणत्याही आजारापासून सुटका होऊ शकते.त्यामुळे आरोग्यविषयी संकटे टाळण्यास खरी मदत झाली. वेगवेगळया आजारांपासुन बचाव करण्यासाठी रानभाज्यांचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे विचार प्रतिपादीत केले.