इतर

पारनेरची कन्या पै.लावण्या गोडसे ठरल्या लोकनेते महीला किताबाच्या मानकरी !

दत्ता ठुबे

पारनेर प्रतिनिधी :
पारनेरची कन्या पै.लावण्या गोडसे ठरल्या लोकनेते महीला किताबाच्या मानकरी !
अल्पावधीतच आपल्या कार्य कुशल नेतृत्वाने प्रचलित झालेले पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार आमदार निलेश लंके यांचा दहा मार्च रोजी होणारा वाढदिवस हा संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विविध उपक्रमाद्वारे साजरा होत आहे .आमदार निलेश लंके यांच्यावर प्रेम करणारा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात राज्यभर पसरला आहे .त्याचाच एक भाग म्हणून आमदार लंके यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी लोकनेते महिला कुस्ती किताब 2023 चे वारजे पुणे येथे आयोजन करण्यात आले होते .
त्या मध्ये 70 मुलींनी सहभाग नोंदवून स्पर्धेची शोभा वाढवली . विजेत्याला मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे मानाची गदेसाठी पारनेर तालुक्यातील भाळवणी गावातील कन्या जिने आजवर अल्पवयातच कुस्ती क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटविला आहे अशी पै. लावण्या प्रमोद गोडसे या पैलवान कुमारीकेने पुणे जिल्ह्यतही आपल्या प्रक्षेणीय कुस्तीच्या माध्यमातुन घवघवीत यश संपादीत करत लोकनेता महिला कुस्ती किताब 2023 ची मानकरी ठरली आहे .
पै. लावण्या गोडसे व पै सिद्धी घिसरे पुणे यांची मंगळवारी वारजे पुणे येथे झालेल्या स्पर्धेत अटीतटीची लढत झाली त्यात लावण्या गोडसे विजयी होऊन लोकनेते महिला किताब 2023 पटकावत मानाच्या गदेची मानकरी ठरली. पै.लावण्या गोडसे हिस NIS कुस्ती कोच किरणराव मोरे सर ,महाकाल कुस्ती संकुल पीसोळी ,पुणे यांचे मार्गदर्शन लाभले .
कार्यक्रमाचे उद्घाटन मा राणीताई लंके ( जि प सदस्य नगर ) व मा रुपालीताई चाकणकर ( राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्ष ) यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून मा. अनिताताई इंगळे(जि प सदस्या पुणे ),मा . सायलीताई वांजळे ( मनपा सदस्य पुणे ),लक्ष्मीताई दुधाने (मनपा सदस्य पुणे ),मा आरतीताई वांजळे (सरपंच शिवणे),मा हलिमाताई शेख(अध्यक्ष अल्पसंख्याक विभाग पुणे).कार्यक्रमाचे आयोजन मा आशाताई सुभाष वांजळे (सरचिटणीस NCP पुणे ) व लोकनेते आमदार निलेश लंके प्रतिष्ठान पुणेचे पदाधीकारी हितचितक व शेकडो कुस्ती शौकिनांच्या उपस्थितीत ही स्पर्धा पार पडली .अमित दादा बैलभरे,मा पै निलेश भाऊ वांजळे,मा तुषार नरसाळे, मा अभयशेठ नांगरे,मा राज शिनारे,मा संगिताताई बैलभरे यांच्या सह रूपालीताई चाकणकर राणीताई निलेश लंके यांच्या हस्ते ही मानाची गदा देत कु. पैलवान लावण्या गोडसे हिस लोकनेते महिला कुस्ती किताब 2023 देत सन्मानित करण्यात आले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button