अकोल्यातील मधुकर तळपाडे यांचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश
अकोले प्रतिनिधी
तीन वेळा विधानसभेची निवडणूक लढवून आमदारकीचे स्वप्न पूर्ण न झालेल्या मधुकर तळपाडे यांनी अखेर उद्धव ठाकरे यांच्या शिव सेनेला जय महाराष्ट्र केला आहे त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे निवडणूक लढविलेले मधुकर तळपाडे यांनी आज रविवारी (दि.29) दुपारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची साथ सोडत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेते प्रवेश केला.
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिर्डी संस्थानचे माजी विश्वस्त डॉ. जालिंदर भोर यांनी तालुक्यातील शिवसेनेच्या पक्षबांधणीत विशेष लक्ष घातले आहे. त्यांच्या पुढाकारातून काही दिवसांपूर्वी माजी उपसभापती मारुती मेंगाळ, अमृतसागर दूध संघाचे संचालक जगन देशमुख, रामदास आंबरे, अगस्ति पतसंस्थेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब भोर, रोहिदास भोर, जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक सुशांत गजे, माजी नगरसेवक सचिन शेटे, धामणगाव आवारीचे उपसरपंच गणेश पापळ, औरंगपूरचे माजी उपसरपंच प्रकाश पाचपुते, भाजप अल्पसंख्यांक सेलचे जावेद जहागिरदार, शेतकरी संघटनेचे नेते सुभाष येवले आदिंनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यापाठोपाठ मधुकर तळपाडे यांनीही आज शिंदे सेनेत प्रवेश केला
पोलीस अधीक्षक पदाचा राजीनामा देऊन राजकारणात आलेल्या मधुकर तळपाडे यांनी 2009 व 2014 मध्ये शिवसेने कडून अकोले विधानसभेची निवडणूक लढवली होती. यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला. 2024 च्या निवडणुकीत ते महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते, पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांना आमदारकीचे स्वप्न पूर्ण करता आले नाही
पक्ष प्रवेशावेळी राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे, डॉ. अमोल भोर, उपजिल्हाप्रमुख मारुती मेंगाळ, तालुकाप्रमुख सुशांत गजे, युवासेना जिल्हाप्रमुख महेश देशमुख, तालुका कार्याध्यक्ष जगन देशमुख, तालुका सहसचिव सुभाष येवले, महिला आघाडीच्या शर्मिला येवले, अकोले शहर कार्याध्यक्ष जावेद जहागिरदार, शहर सचिव सचिन भालेराव, गटप्रमुख प्रकाश पाचपुते आदी उपस्थित होते.
मधुकर तळपाडे यांचा पक्ष प्रवेश आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला बळकटी आणणारा असा आहे. यामुळे अकोले तालुक्यात शिवसेना शिंदे पक्षाची ताकद वाढली आहे.
————