राजूर येथील सर्वोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक महोत्सव सम्पन्न

विलास तुपे
राजूर:प्रतिनिधी
राजूर येथील गुरुवर्य रा. वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक महोत्सव मोठया उत्साहात पार पडला. विद्यालयातील ३५० मुला मुलींनी विविध गुणदर्शन स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धेमधील उत्स्फुर्द सहभाग व सांस्कृतिक महोत्सवामध्ये त्यांनी सादर केलेल्या कला गुणांनी राजूरकर भारावून गेले. हा कार्यक्रम विद्यालयाच्या वातानुकूलित पटांगणात सादर करण्यात आला. विद्यालयाच्या परंपरेनुसार विशिष्ठ संकल्पनेवर आधारित स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. भावसाक्षरता, वैज्ञानिक दृष्टिकोन, वाहन विवेक, राष्ट्रीय जबाबदारी, ध्येय निश्चिती, निसर्गाबाबतची कृतज्ञता या समाजमन घडवणाऱ्या विषयावर मुलांनी सुंदर सादरीकरण केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होता. यावेळी विद्यार्थी पालक यांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला.

या स्पर्धेचे उद्घाटन सत्यनिकेतन संस्थेचे संचालक तथा माजी प्राचार्य एस.टी. येलमामे, बंडू शाळीग्राम, संचालक मिलिंद उमराणी, राम पन्हाळे, विजय पवार यांच्या हस्ते करण्यात आले. हे स्नेहसंमेलन केवळ नाट्य, नृत्य यांचा अविष्कार न राहता ते विचारांचे संमेलन बनले, हे संमेलन अंतर्मुख करणारे होते असे प्रतिपादन प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात केले. या कार्यक्रमप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य एम.डी. लेंडे, उप प्राचार्य बी. एन. ताजणे व पर्यवेक्षक मधुकर मोखरे व सर्व शिक्षक व शिक्षिकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून विलास गोसावी व दीपक पाचपुते यांनी काम पाहिले.
या विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन कार्यक्रम प्रमुख बी.एस. घिगे व एस. आर. गिरी यांनी आयोजन केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतराम बारवकर व शरद तूपविहीरे यांनी केले. या कार्यक्रमात सौ. बिना सावंत, एफ. धतुरे, सौ. श्रद्धा भालेराव, सौ. व्ही. के सोनवणे, के.व्ही. देशमुख, शरद तूपविहीरे, आर.डी. साबळे, एम,एस. दिंडे, व्ही. बी. पांडे, अजित गुंजाळ, सुधीर आहेर, आशिष हंगेकर, विलास तुपे, स्वप्नील नवाळी व सर्व शिक्षक व शिक्षिकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
