२२ वी नॅशनल लेव्हल अबॅकस कॉम्पिटिशन स्पर्धा पारनेर शहरात संपन्न !

एवरेस्ट अबॅकस अकॅडमीच्या रेश्मा कळमकर “बेस्ट ऑफ द इयर” पुरस्काराने सन्मानित !
दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी :
पारनेर शहरात प्रथमच २२ वी नॅशनल लेव्हल अबॅकस कॉम्पिटिशन अगदी उत्साहात पार पडली.
या कॉम्पिटिशनमध्ये १२४० विद्यार्थी सहभागी होते.
कॉम्पिटिशनचा मूळ हेतू विद्यार्थ्यांचे गणिताचे स्पीड वाढवणे हाच होता.
विद्यार्थ्यांनी अगदी पाच मिनिटात १७५ बेरजा आणि वजाबाकी १४५ गुणाकार १६७ भागाकार तर १६० वर्ग सोडविले.
ही कॉम्पीटीशन रविवारी सकाळी दहा वाजता घेण्यात आली.
लगेचच अगदी काही तासांच्या प्रतीक्षेनंतर विद्यार्थ्यांना परीक्षेचा रिझल्ट कळवण्यात आला. याच दिवशी आपण या विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरण कार्यक्रम सुद्धा अगदी उत्साहात घेण्यात आला.
कार्यक्रम प्रसंगी एवरेस्ट अबॅकस अकॅडमीचे अध्यक्ष अभय कारले सर पारनेर तालुक्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड साहेब, उप पोलीस निरीक्षक हनुमान उगले साहेब
तर प्रमुख उपस्थिती म्हणून तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती पारनेर डॉक्टर सुदाम बागल सर
संस्कार प्रतिष्ठानचे संस्थापक व डी बी एम स्कूल इंग्लिश मीडियम चे प्रिन्सिपल सर जालिंदर मापारी सर
तर पत्रकार सकाळ वृत्तसेवा चे रावसाहेब अरुण चक्रे सर यांनी प्रमुख उपस्थिती म्हणून हजेरी लावली.
ही परीक्षा वर्षातून एकदा वेगवेगळ्या चार सेंटरमधून घेतली जाते.
पुणे जिल्ह्यातील प्रामुख्याने शिरूर देवदैठण, संपूर्ण पारनेर तालुका, अहमदनगर जिल्ह्यातील काही खेड्यापाड्यातील विद्यार्थी यात सहभागी होते.
अबॅकस हा विषय फक्त पूर्वी उच्चवर्गीय घरातील विद्यार्थी शिकत असायचे परंतु एवरेस्ट अबॅकस अकॅडमी मध्ये ४४८ सर्व महिला शिक्षिका काम करत असल्याने प्रत्येक खेड्यापाड्यात अबॅकस प्रशिक्षण सध्या सुरू होत आहे.
अकॅडमीच्या मार्गदर्शिका घडेकर मॅडम,
प्रतिभा पुजारी, रेश्मा कळमकर, सुवर्णा ठोकळ, जाधव सर खोडदे मॅडम, सोनवणे मॅडम, विद्या पवळे मॅडम बनकर मॅडम अश्विनी उगलेमॅडम,वागस्कर मॅडम,जंबे मॅडम, अण्णासाहेब शिंदे सर, लोंढे मॅडम,पवार मॅडम, रेणुका दिघोळकर मॅडम,दुर्गा पवार मॅडम कानडे मॅडम, भोसले मॅडम,खेटमालिस मॅडम,ठाणगे मॅडम,चौधरी मॅडम पुंड मॅडम, साठे मॅडम
विद्यार्थ्यांना यांचे मार्गदर्शन लाभले .
पारनेर पंचक्रोशीत अभिमानास्पद गोष्ट म्हणजे
२२ व्या नॅशनल लेवल अबॅकस कॉम्पीटीशन मध्ये पारनेरचे ९ विद्यार्थी चॅम्पियन १४६ विद्यार्थी टॉप टेन रँक तर ११० विद्यार्थी बेस्ट रँक मानांकन प्राप्त अबॅकस मधून पारनेर ची अनोखी ओळख
अबॅकसमुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेत अधिकाधिक भर पडून शालेय रिझल्ट मध्ये वाढ होत आहे.
अबॅकस मध्ये जरी फक्त गणित असेल तरीसुद्धा इतर विषयांच्यात सुद्धा मदत होते. विद्यार्थी तर्कशक्तीच्या आधारे सोडवतात गणिते.
कॉम्पिटिशन ही फक्त पाच मिनिटांची असते
या पाच मिनिटात विद्यार्थ्यांना आपलं कौशल्य दाखवायचे असते
पाच मिनिटांच्या या स्पर्धेमध्ये विद्यार्थी १५० पेक्षा जास्त वजाबाकी बेरीज
१६० गुणाकार भागाकार
२०० वर्ग संख्या सोडवतात.
पारनेर मध्ये या विद्यार्थ्यांना सौ.कळमकर मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
एवरेस्ट अबॅकस अकॅडमीच्या माध्यमातून अल्पावधीतच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच सर्वसामान्य गरीब कुटुंबातील मुलांना गणिताची गोडी लावून प्रश्न सोडवायची गती वाढवणाऱ्या सौ रेश्मा कळमकर यांनी केलेल्या कार्याची दखल घेत व महाराष्ट्रात सर्वाधिक विद्यार्थ्यांना एकाच वेळी उल्लेखनीय प्रशिक्षण देणाऱ्या कळमकर यांना रविवारी एवरेस्ट अबॅकस अकॅडमी च्या माध्यमातून बेस्ट ऑफ द इयर अवॉर्ड देत सन्मानित करण्यात आले .
कळमकर यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून,बाल विद्यार्थी मित्रांचा बुद्ध्यांक वाढविण्यासाठी व गणिताची गोडी त्यांच्या मनात निर्माण करण्यासाठी चिमुकल्यांना दिलेले प्रशिक्षण त्याची दखल घेऊन त्यांना मिळालेला पुरस्कार त्यामुळे पालक वर्गात समाधानाचा व कौतुकाचा विषय ठरत आहे.