इतर
अल्पोआहाराचे वाटप करुन अनोखा आदिवासी दिन साजरा!

.
अकोले/प्रतिनिधी-
कट्टा फ्रेंड्स सर्कल, कॉलेजरोड, राजूर येथे तरूणांनी अल्पोआहाराचे वाटप करून अनोखा आदिवासी दिन साजरा केला.
राजूर येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयासमोर आदिवासी युवकांनी उपस्थित सर्वांना अल्पोपहार, चहा, बिसलेरी पाणि वाटप करून मोठ्या उत्साहाने आदिवासी दिन साजरा केला.
यावेळी साहिल पठाण, दिग्विजय लांघी, सुशांत देशमुख, अमित भांगरे, राजेंद्र घिगे, वैभव बारामते, स्वप्निल भांगरे, प्रशांत भांगरे, निलेश लोहकरे, स्वप्निल घिगे, शंकर भांगरे, शुभम डिंग्या, अरविंद कोकाटे, विशाल कोकाटे, यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.