तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धात सर्वोदय विदया मंदिर राजुरचे सुयश.

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा अॅड.एम.एन.देशमुख महाविदयालय राजुर येथे नुकत्याच संपन्न झाल्या.या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धांत सत्यनिकेतन संस्थेचे गुरूवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विदया मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय राजुर या विदयालयाने नेत्रदिपक कामगिरी करत तालुकास्तरावर घवघवित यश संपादन केले.आहे.
या स्पर्धांत १४ वर्षे मुले फ्रीस्टाईल ३५ किलो वजनगटात प्रणव बोऱ्हाडे प्रथम क्रमांक, ३८ किलो वजनगटात यश चौधरी प्रथम क्रमांक,४१ किलो वजनगटात सार्थक चौधरी प्रथम क्रमांक, सार्थक सदगिर द्वितिय क्रमांक, ४८ किलो वजनगटात साई नागरे प्रथम क्रमांक,६२ किलो वजन गटात साईनाथ जाधव प्रथम,६८वजनगटात संग्राम फडतरे प्रथम क्रमांक मिळविला.
१७ वर्षाखालील मुले फ्रीस्टाईल ४१ते४५ किलो वजनगटात जयेश बोऱ्हाडे प्रथम,अधिराज देशमुख द्वितीय क्रमांक, ४८ किलो वजनगटात प्रतिक दातखिळे प्रथम क्रमांक, ५१ किलो वजनगटात समिर खाडगिर प्रथम, समिर धिंदळे द्वितीय क्रमांक,६० किलो वजनगटात सार्थक ढोकणे प्रथम, ६५ किलो वजनगटात सार्थ दहिफळे प्रथम, ७१ किलो वजनगटात भैरवनाथ शेंडगे याने प्रथम क्रमांक मिळविला.८० किलो वजनगटात प्रणव पुंडे प्रथम, ईश्वर जगदाळे द्वितीय क्रमांक.
१७ वर्षाखालील मुलींमध्ये फ्रीस्टाईल ४३ किलो वजनगटात ईश्वरी जाधव प्रथम क्रमांक.
१७वर्षाखालील मुलांमध्ये ग्रीकोरोमन प्रकारात ४१ते ४५वजनगटात निलेश लोहरे याने प्रथम क्रमांक मिळविला.
१९ वर्षे मुले फ्रीस्टाईल प्रकारात ५७ किलो वजनगटात शिवम हिले प्रथम, शंकर सोडनर द्वितीय क्रमांक, ६१ किलो वजन गटात ज्ञानेश्वर देशमुख प्रथम,६५ किलो वजनगटात तेजस लोटे प्रथम,७४ किलो वजन गटात जयेश सुकटे प्रथम,९७ किलो वजनगटात आयुष दातखिळे प्रथम, मुलींमध्ये ५३ किलो वजन गटात दिक्षा सोनवणे प्रथम क्रमांक मिळविला. सर्व गुणवंत खेळाडूंना क्रिडा शिक्षक जालिंदर आरोटे, विनोद तारू,तान्हाजी नरके यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व कुस्तीपटटू राजुर येथील अॅड.एम.एन. देशमुख महाविदयालयातील साई कुस्ती केंद्रात सराव करतात.
या नेत्रदिपक कामगिरीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. यशस्वी खेळाडू तसेच मार्गदर्शक क्रिडाशिक्षकांचे सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष अॅड. मनोहरराव देशमुख,सचिव टि.एन. कानवडे, कोषाध्यक्ष विवेकजी मदन, संचालक मिलिंद उमराणी, मारूती मुठे, अशोक मिस्त्री, विजय पवार,विलास पाबळकर, माजी प्राचार्य प्रकाश टाकळकर, प्रकाश महाले, प्राचार्य भाऊसाहेब बनकर, प्राचार्य डॉ.भाऊसाहेब देशमुख, उपप्राचार्य अण्णासाहेब धतुरे,पर्यवेक्षक सदाशिव गिरी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक आदींनी अभिनंदन केले. तसेच भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.