सत्यनिकेतन संस्थेचे बारावी बोर्ड परीक्षेत नेत्रदिपक कामगिरी.

विलास तुपे
राजूर /प्रतिनिधी-
अकोले तालुक्यातील राजुर येथील सत्यनिकेतन संस्था अंतर्गत असलेल्या उच्च माध्यमिक विदयालयांचा एच.एस.सी.बोर्ड परीक्षेत नेत्रदिपक कामगिरी करत निकालाचा आलेख दरवर्षाप्रमाने याही वर्षी उंचावलेला पहावयास मिळत आहे. त्यामुळे पालक वर्गात चांगलेच समाधान व्यक्त होत आहे. या बोर्ड परीक्षेत सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील राजुर येथील गुरुवर्य रा.वि. पाटणकर सर्वोदय विद्यामंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयातील
विज्ञान शाखेचा निकाल १००%. लागला असुन यामध्ये
आरोटे लोपामुद्रा सुदाम हिने ७४.१७% गुण मिळवून प्रथम क्रमांक,लेंडे प्रगती श्रीराम हिने ७३.५०% गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर लांघी प्रमिला विलास हिने ७२.५०% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.
वाणिज्य शाखेचा निकाल ९७.५९% लागला असुन
या शाखेत मेहता गुनल दिनेश ७८.१७% गुण मिळवून प्रथम क्रमांक,जगदाळे सर्वेश सुनील ७७.६७% गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर सोनवणे प्रशांत आनंदा याने ७७.३३% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.तसेच
कला शाखाचे निकाल ९०.४५ % लागला असुन या शाखेत
धिंदळे किरण भास्कर याने ८९.५०% गुण मिळवून प्रथम क्रमांक,कानकाटे ऋतुजा आसाराम हिने ८७.५०% गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर
मुंडे नितीन तानाजी याने ८४.६७% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.त्याचप्रमाने खिरविरे येथील सर्वोदय विदया मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयातील कला शाखेचा निकाल ९७.१६% लागला असुन या शाखेत डगळे सोमनाथ तुकाराम याने ८०.८३% गुण मिळवून प्रथम क्रमांक,दुटे प्रदिप रामदास याने ७६ % गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर जाधव आकाश लहू याने ७५.१७% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.तसेच विज्ञान शाखेचा निकाल १०० % लागला असुन या शाखेत पराड पोर्णिमा अशोक हिने ७६.३३% गुण मिळवून प्रथम क्रमांक, पराड मानसी निवृत्ती हिने ७०.६७% गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर बेणके मिनल नामदेव हिने ७०.१७% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला. याचप्रमाने राजुर येथील अॅड.एम.एन.देशमुख महाविदयालयातील वाणिज्य शाखेचा निकाल ८२.७५% लागला असुन या शाखेत मुंढे अश्विनी बाळू हिने ७३.५०% गुण मिळवून प्रथम क्रमांक, पदमिरे संदिप निवृत्ती याने ६४% गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर बांबळे विकास सोमनाथ याने ६३% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला. तसेच विज्ञान शाखेचा निकाल ७८.०४ % लागला असुन या शाखेत कानवडे रूपाली साईनाथ हिने ६५% गुण मिळवून प्रथम क्रमांक, काकडे प्रांजल लहू हिने ६३.३३ % गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर बिन्नर सुरज दत्तु याने ६२.५०% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.या नेत्रदिपक कामगिरीमुळे यशस्वी विदयार्थी तसेच मार्गदर्शक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष अॅड.मनोहरराव देशमुख,सचिव टि.एन.कानवडे,कोषाध्यक्ष विवेकजी मदन,संचालक मिलिंदशेठ उमराणी,अशोक मिस्त्री,प्रकाश टाकळकर,प्रकाश महाले,सर्व संचालक यांसह प्राचार्य मनोहर लेंडे,लहानु पर्बत,अंतुराम सावंत, बादशहा ताजणे आदींनी अभिनंदन केले तसेच भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.