गेवराई तालुक्यातील वडगाव ढोक येथे खासदार प्रीतमताई मुंढे यांचे हस्ते विकास कामाचे उद्घाटन

गणेश भाऊ ढाकणे
बीड /गेवराई प्रतिनिधी
गेवराई तालुक्यातील वडगाव ढोक येथे 51लक्ष विकास कामाचे उद्घाटन झाले आहे वेगवेगळ्या शासकीय समितीवर निवड झाल्याबद्दल भाजपचे पदाधिकारी यांचा सत्कार सोहळा व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते बीडच्या लोकप्रिय खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांची विशेष उपस्थितीत कार्यक्रमाचे उदघाटन पार पडले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गोरगरीब शोषित वंचित निराधारांच्या सर्वांगीण विकासाचे विचार तसेच केंद्र व राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या योजना वडगाव ढोक चे गणेश मुंढे यांनी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत.याचाच एक भाग म्हणून बीडच्या खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या प्रयत्नामुळे 2515 योजनेतून गेवराई तालुक्यातील वडगाव ढोक येथे 51 लाख रुपये मंजूर झाले आहेत.या कामाचे उद्घाटन सोमवार दिनांक २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी करण्यात आले या निमित्ताने पदाधिकारी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला जिल्ह्यातील मुलभूत सुविधा संदर्भात खा.प्रितमताई मुंडे यांच्या सोबत गणेश मुंढे यांनी सविस्तर चर्चा केली कार्यक्रमासाठी भाजपचे बीड जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मस्के, जिल्हा संघटन सरचिटणीस प्रा.देवीदास नागरगोजे,भाजपचे गेवराई तालुका अध्यक्ष प्रकाश काका सुरवसे,संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष जे.डी.शहा,भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भूषण पवार,भाजपा भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. लक्ष्मण जाधव,जिल्हा उपाध्यक्ष छगन पवार,कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर पवार,बंजारा क्रांती दलाचे बीड जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण चव्हाण, भाजपचे युवा नेते बाळासाहेब सानप,अँड.ज्ञानेश्वर खाडे, बंडूभाऊ बारगजे,पं.स उपसभापती संदिप लगड,सदस्य प्रा.शाम कुंड,सरपंच बाळू राठोड,उपसरपंच प्रशांत गोबरे यांच्या सह गेवराई तालुक्यातील वडगाव ढोकचे सरपंच उपसरपंच सदस्य पदाधिकारी उपस्थित होते

खा.प्रितमताई मुंडे पहिल्यांदाच वडगाव ढोक मध्ये आल्या म्हणून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली .वडगाव ढोक फाटा गावापर्यंत मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती.