इतर

पुस्तकाची भेट देत गेवराई त विद्यार्थ्याने केले रक्षाबंधन साजरे.

गणेश ढाकणे

बीड /गेवराई प्रतिनिधी


गेवराई येथील आर के पल्लिक स्कुल मधील ८ वी इयत्तेतील विद्यार्थी अंशुल अभिजीत काला यांनी शाळेत रक्षाबंधन उत्सव साजरा करणार असल्याने आपल्या शाळेतील विद्यार्थिनीला राखी घातल्यानंतर आयुष्यभर स्वतःची रक्षा करण्यास सक्षम बनविण्या छत्रपती शिवाजी महारांजाचे ज्वलंत व प्रेरणादायी विचार असलेले पुस्तक व पेन शालेय विद्याथिनीला भेट स्वरूप दिले .याहून मोठी भेट आपल्या लाडक्या बहिणीला काय असणार स्वराज्य रक्षणासाठी ज्यांनी जिवाचे रान केले त्या महान राज्याचे विचार जीवनात अंगिकारल्यास प्रत्येक मुलगी / स्त्री स्वतःचे रक्षण करू शकतेच व भाऊ ही चुकीची गोष्ट करणार नाही हे विचार प्रत्येकाच्या मनात व व्यावहारितेत रुजवणे आवश्यक आहे सदरील विद्यार्थाचे किराणा व्यापारी संघटनाच्या व्यापारी वर्गाकडून , हिंदु जनजाग्रती समिती , जागर नारी शक्तीचा आदि अन्य संघटना मार्फत ही मनसोक्त कौतुक होत असून त्याची छत्रपति शिवाजी महाराजां प्रतिजी श्रध्दा आहे ती निश्चित वाखण्याजोगी आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button