अकोल्यातील वैभव मंडलिक याची एल. आय .सी . च्या प्रशासन अधिकारी पदावर निवड!

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील माळीझाप येथील वैभव किसनराव मंडलिक याची नुकतीच भारतीय आयुर्विमा महामंडळात एल .आय .सी. मध्ये प्रशासन अधिकारी (वर्ग १) या पदावर निवड झाली आहे सेवानिवृत्त मुख्याध्यापक के. टी. मंडलिक यांचे सुपुत्र असणाऱ्या वैभव चे चे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे
आय बी पी एस मार्फत त्याची युनियन बॅँक ऑफ इंडिया मध्ये निवड झाली मुंबई येथे सेवारत असताना त्याने एल आय सी ची निवड परीक्षा दिलीं त्यात तो उत्तीर्ण झाल्याने त्याची एल आय सी चे प्रशासन अधिकारी वर्ग १ या पदावर निवड झाली
वैभव मंडलिक चे बी इ मॅकेनिकल शिक्षण कोपरगाव येथील संजीवनी कॉलेज येथे झाले. प्राथमिक शिक्षण नवलेवाडी ता अकोले येथील प्राथमिक शाळेत झाले तर राहुरी विद्यापीठात माध्यमिक शिक्षण झाले. त्याचे मोठे बंधू भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये औरंगाबाद येथें व्यवस्थापक म्हणून कार्य रत आहे
आमदार डॉ किरण लहामटे, माजी आमदार वॆभवराव पिचड ,अगस्तीचे चेअरमन सीताराम पाटील गायकर ,संचालक मिनानाथ पांडे, जिल्हा बँकेचे संचालक मधुकरराव नवले ज्येष्ठ पत्रकार भाऊसाहेब मंडलिक , समता परिषदेचे प्रशांत शिंदे ,मच्छीन्द्र गुलदगड, बाळासाहेब ताजने, गुलाबराव शेवाळे ,प्रकाशराव मालुंजकर ,बाळासाहेब बिन्नर , प्रा बी एम महाले ,गोपीनाथ नाईकवाडी, स्वदेश उद्योग समूहाचे बाळासाहेब देशमाने, वसंतराव देशमुख ,सुनील गीते आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे