नाशिकसामाजिक

मंत्री भुजबळ यांचे हस्ते सुरेशराव कोते यांना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार!

नाशिक- रेड स्वस्तिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष व लिज्जत पापड उद्योग समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेशराव मारुती कोते यांना नाशिक जिल्हा कुंभार विकास समितीच्या वतीने दिला जाणारा “राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार” नुकताच प्रदान करण्यात आला

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे हस्ते नाशिक येथे दि ०३ /०९/ २०२३ रोजी हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला

यावेळी आमदार देवयानी फरांदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष शरद आहेर, महाराष्ट्र कुंभार समाज सामाजिक संघटनेचे अध्यक्ष सतीश दरेकर, रमाकांत क्षीरसागर सोमनाथ सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते

सुरेशराव कोते हे अहमदनगर जिल्ह्यातील (कोतुळ तालुका अकोले) येथील भूमिपुत्र असून त्यांनी विविध सामाजिक, शैक्षणिक, सहकार व धार्मिक संस्थांचे माध्यमातून काम केले आहे लिज्जत समूहाच्या माध्यमातून महिलांना देशभर रोजगाराचे जाळे निर्माण केले.

राज्यात श्री कोते यांचे सामाजिक शैक्षणिक ,धार्मिक ,अध्यात्म अशा अनेक क्षेत्रात मोठे भरीव काम आहे त्यांच्या या कार्याबद्दल अनेक वेळा विविध राज्य व राष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कारांनी त्यांना यापूर्वी सन्मानित करण्यात आलेले आहे सातासमुद्रा पार त्यांच्या कामाचा गौरव झाला दुबई येथील संस्थेने त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे

लेप्रसी रिहबीटीलेशन ट्रस्टचे ते कार्याध्यक्ष असून या माध्यमातून लेप्रसीरोगी च्या उद्धारासाठी त्यांनी उत्कृष्ठ काम केल्याने श्री कोते यांना राष्ट्रपती रामनाथ कॊविंद यांचे हस्ते सन २०१९ ला दिल्लीत सन्मान झाला , रेड स्वस्तिक च्या माध्यमातून आरोग्य विषयक कामाचा राज्यपाल भगतसिंग कोषारी, तसेच कर्नाटक चे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांचे हस्ते सन्मान झाला होता

पुणे येथील श्री संत गोरोबा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ,पुणे येथील लक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष ,आरोग्य क्षेत्रात काम करणारी रेड स्वस्तिक संस्था चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, अभिनवं शिक्षण संस्था अकोले चे अध्यक्ष , कोतुळेश्वर देवस्थान चे अध्यक्ष , वाघापूर च्या आंबिक माता देवस्थान चे अध्यक्ष अशा अनेक संस्थांवर ते कार्यरत आहेत त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आल्याने त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button