गुरू रडायला नाही,लढायला शिकवतात- प्राचार्य बनकर.

सर्वोदय विदया मंदिर राजुर येथे शिक्षकदिन उत्साहात संपन्न
.
अकोले/प्रतिनिधी-
ओळखलत का सर मला पावसात आला कोणी.कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला.पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार,तरी मोडला नाही कणा. पाठीवरत हात ठेवून फक्त लढ म्हणा. याप्रमाणे गुरू रडायला नाही तर लढायला शिकवतात. असे प्रतिपादन प्राचार्य भाऊसाहेब बनकर यांनी केले.
अकोले तालुक्यातील गुरूवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विदया मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय राजुर येथे शिक्षकदिन उत्साहात संपन्न झाला.यावेळी प्राचार्य भाऊसाहेब बनकर अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
या प्रसंगी व्यासपिठावर उपप्राचार्य आण्णासाहेब धतुरे,प्रा.दिपक बुऱ्हाडे,प्रा.संतोष कोटकर,प्रा.शरद तुपविहीरे,प्रा.बिना सावंत,प्रा. स्मिता हासे,प्रा.संतराम बारवकर,प्रा.अमोल तळेकर,प्रा.बाळासाहेब घिगे,प्रा.सुधिर आहेर,प्रा.सुरेश शेटे,प्रा.संतोष नवले,प्रा.रविंद्र मढवई,प्रा.सचिन लगड,प्रा.अजित गुंजाळ,प्रा.संतोष बारामते,प्रा.रविंद्र कवडे,प्रा.आरती देशमुख,प्रा.विकास जोरवर,प्रा.सुरेखा नवाळी,प्रा.मधुमंजिरी पवार,प्रा.कांचन सोनार यांसह विदयार्थी शिक्षक,विदयार्थी उपस्थित होते.
प्राचार्य श्री.बनकर यांनी पुढे बोलताना आजचा दिवस हा विदयार्थांच्या जिवणातील अविस्मरणिय क्षण असून गुरू शिष्याचे अतुट नाते जपण्याचे कार्य करा असे विचार प्रतिपादित केले.
उपप्राचार्य आण्णासाहेब धतुरे यांनी मन मे है विश्वास याप्रमाणे ध्येयाचा ध्यास घेतला तर यश हमखास मिळते. ध्येय निश्चित असले पाहीजे असे मत व्यक्त केले.
प्रा.संतराम बारवकर यांनी ज्ञानदानाचे अथक काम हे गीता अर्जुनाला जिवन जगण्याचा कर्म सिद्धांत शिक्षकाच्या भूमिकेतून श्रीकृष्णाने दिले.याप्रमाणे पहिला गुरू आई वडील असतात.ते संस्कार,कर्तव्याची जाणीव करून देतात.तर दुसरे गुरू शिक्षक जिवणाचे धडे देऊन जिवनाला कलाटणी देण्याचे कार्य करतात.असे विचार मांडले.
प्रा.सचिन लगड यांनी पेरले तसेच उगवते त्यामुळे गुरूशिवाय ज्ञान नाही आणि ज्ञानाशिवाय प्रगती नाही. त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात एक चांगला गुरू असावा लागतो.असे विचार व्यक्त केले.
यावेळी विदयालयाचे कामकाज प्राचार्या म्हणून विदयार्थीनी अपेक्षा मढवई व विजया सावंत यांनी शिस्तबद्ध पार पाडले.विदयार्थांना बहुमोल मार्गदर्शन केले.विदयार्थी शिक्षिका रसिका तळेकर,करूणा बांबेरे,शिल्पा देठे यांनी आपल्या मनोगतात शिक्षकांप्रती कार्याचे वर्णन केले.या दिवशी विदयार्थांनी शिक्षकाच्या भुमिकेत विदयालयाचे कामकाज चालविले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.रविंद्र मढवई यांनी केले.
अध्यक्षीय सुचना श्रद्धा लेंडे हिने मांडली. त्यास प्रियंका माचरेकर हिने अनुमोदन दिले.
सुत्रसंचलन चंदु भांगरे याने केले तर अस्मिता मुतडक हिने उपस्थितांचे आभार मानले.