राजापूर च्या नूतन महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा!

संगमनेर दि.५
प्रागतीक शिक्षण संस्थेचे नूतन कला महाविद्यालय राजापूर ता.संगमनेर येथे दिनांक 5 सप्टेंबर 2023 रोजी विद्यार्थी विकास मंडळ अंतर्गत शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे जेष्ठ संचालक भानुदास सोनवणे उपस्थित होते
.शिक्षक दिनानिमित्त अनेक विद्यार्थ्यांनी विद्यार्थी-प्राध्यापकाची भूमिका पार पाडून विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे दिले. विद्यार्थी-प्राचार्य म्हणून कुमारी साक्षी हासे हिने प्रास्ताविकात गुरु हे वंदनीय असतात असे मत व्यक्त केले. यावेळी सर्व प्राध्यापकांचा व विद्यार्थी-प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला . विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
. भानुदास सोनवणे यांनी अध्यक्षीय मनोगतात शिक्षक आपल्याला जे ज्ञान देतात त्या ज्ञानाचा योग्य वापर करून आपण जीवनात यशस्वी झाले पाहिजे असे मत मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी कीर्ती निकम तर संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.प्रवीण आहेर यांनी प्राचार्य डॉ.सुभाष कडलग यांच्या मार्गदर्शनाखाली केले. कुमारी निकिता राहणे हिने उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.