जागतिक महिला दिनानिमित्त ऑनलाईन फॅशन डिझायनिंग व केश रचना वर्गाला प्रतिसाद!

सोलापूर : सोलापूरातील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन संचलित पद्मशाली सखी संघमच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला सक्षम व्हावेत म्हणून ऑनलाईन घेतलेल्या फॅशन डिजाइनिंग आणि केश रचना वर्गाला (हेअर स्टाईल) अनेक महिलांनी ऑनलाईनला (मोबाईल) उस्फूर्त प्रतिसाद दिल्या.
महाशिवरात्री निमित्ताने शुक्रवारी पूर्व भागातील श्रीराम मंदिर येथे घेण्यात आलेल्या ‘श्री शिव सहस्त्रनाम स्तोत्रम्’ या पठणाच्या कार्यक्रमाला वज्रेश्वरी गाजूल, बालाजी मंदिरातील विष्णू सहस्त्रनाम ग्रुपच्या महिला, जमुना इंदापूरे, सुरेखा भिमनपल्ली, पल्लवी संगा, पार्वती अन्नलदास, पल्लवी चन्ना, मीरा आडम,भारता आडम,उमा सुरमपल्ली, स्वरुपा अलवाल यांच्यासह अन्य महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सुरवातीला महादेव लिंगाचे जलाभिषेक करुन विधीवत पूजा करण्यात आले. सखी संघमच्या वतीने उपस्थित महिलांना ‘बेलपत्री’ आणि मोबाईलवर श्री शिव सहस्त्रनाम स्तोत्रम् चे ‘पीडीएफ’ पाठवण्यात आले. हा कार्यक्रम लक्ष्मी कोडम यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.कला चन्नापट्टण यांनी सूत्रसंचालन केल्या. कल्पना जोरीगल यांनी मनोगत व्यक्त करुन महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. रविवारी संध्याकाळी झालेल्या फॅशन डिजाइनिंग वर्गात पुण्याचे प्रसिद्ध असलेल्या लिबर्टी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे दिलीप कारमपुरी यांनी बोटनेक ब्लाऊजचे विविध लेटेस्ट डिझाईन व कॉलर गळा, ओवर लॅप बाही, जीप ब्लाउज, फ्रॉक व पंजाबी ड्रेस अश्या अनेक प्रकारच्या फॅशन डिजाइनिंगचे कटिंग व डेमो करून दाखविले आणि ते करत असताना काही टिप्स सुद्धा दिले. तब्बल दोन तास चाललेल्या फॅशन डिजाइनिंग ऑनलाईन वर्ग बघत थोडेफार आत्मसात केल्याचे काही महिलांनी फोन करुन सखी संघमच्या अध्यक्षांना कळविल्या.
सोमवारी झालेल्या केश रचना (हेअर स्टाईल) शिकण्यासाठी ऑनलाईन वर्गाला उपस्थित राहून अनेक महिला समाधान व्यक्त केल्या. संगमनेर येथील ‘प्रिया मेकअप स्टुडिओच्या प्रियांका अक्षय दासरी यांनी विविध प्रकारच्या स्टेडिशनल पार्टीवेअर, बटरफ्लाय, इतर अनेक प्रकारच्या प्रात्यक्षिका करून दाखविले. दोन्ही ऑनलाईन वर्गासाठी सूत्रसंचालन, प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन सखी संघमच्या अध्यक्षा ममता मुदगुंडी यांनी केल्या.
