इतर

पेंडशेत येथे मनसेकडून ई पिक पाहणी करण्यासाठी जागृती मोहीम.


अकोले/प्रतिनिधी

प्रत्येक वर्षी नैसर्गिक आपत्तींमुळे भारतातील शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. महापूर, चक्रीवादळे, गारपीट, अतिवृष्टी आदि नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांची अपरिमीत हानी होते. अशा संकटातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजना (पीएमएफबीवाय) सुरू केली आहे. १३ जानेवारी २०१६ रोजी या योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता.
पेंडशेत हे गाव तस दुर्गम भागात वसलेलं गाव आहे,त्यामुळे येथील लोकांनाच व्यवसाय प्रामुख्याने शेती हा आहे, येथील शेतकरी दिवस रात्र मेहनत करून वादळ,पाऊस,वाऱ्याची पर्वा न करता शेती करतो, परंतु गारपीट,अवकाळी पाऊस कीटकांचा प्रादुर्भाव या यासारख्या नेसर्गिक अपतींमुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेल्या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान होते, यामुळे येथील शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो.
त्यामुळे ई- पीक पहानी लावणे येथील शेतकऱ्यांना खूप गरजेचं आहे,यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पेंडशेत शाखे चे पदाधिकारी शाखा अध्यक्ष हेमंत पदमेरे व मनसे ग्रामसंघटक शिवराम बांडे यांनी गावात फिरून गावातील शेतकऱ्यांना ई- पीक पहानी लावण्या साठी जागृती करुन ज्या शेतकऱ्ऱ्यान जवळ मोबाईल नाही अश्या शेतकऱ्यांची ई- पीक पहानी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन लावून दिली.यासाठी सबंधित शेतकऱ्यांनी राज साहेब ठाकरे व मनसे शाखा पेंडशेत यांचे आभार मानले. या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button