नेवासा पोलिसांनी मोटारसायकल
चोरास पकडले आहे.

दत्तात्रय शिंदे
माका प्रतिनिधी
नेवासा फाटा येथे समस्या त्रिते फिरणाऱ्या तरुणाला नेवासा पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून मोटरसायकल चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे
दि. 01 मार्च 2022 रोजी रात्रगस्त दरम्यान स.फौ. साळवे, पो.कॉ. राजपुत, वाहन चालक कु-हाडे यांना दोन ईसम एका विना नंबरचे मोटारसायकल वरुन संशयीतपद रीत्या फिरत असल्याचे नगर औरंगाबाद हायवेवरील नेवासा फाटा रिलायन्स पेट्रोल पंप येथे आढळले त्यांना गाडी थांबण्यासाठी सांगितले असता ते पळूनजाण्याचा प्रयत्न करु लागले. वरील पोलीस पथकाने त्यांचा पाठलाग करुन एकास मोटार सायकलसह पकडले असतात्याच्या अंगझडतीमध्ये तीन मोबाईल मिळुन आले. पोलीस पथकाने त्याकडे अधिक तपास केला असता इसमाने त्याचे नाव ज्ञानेश्वर गणपत शडूते (वय 24 वर्षे रा. घुलेवाडी ता. संगमनेर जि. अहमदनगर असे सांगितले. त्याच्याकडे सापडलेली हीरो-होन्डा कंपनीची काळ्या रंगाची मोटारसायकल क्रमांक- MH-17 BQ-8967 ही नेवासा पोलीस स्टेशन गुं. र.न 165/2022 भा.द.वी कलम 379 मधील चोरीस गेलेली मोटारसायकल आढळुन आली आहे. सदर मोटारसायकल चोराकडुन आणखी वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे. पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती स्वाती भोर, उपविभागिय पोलीस अधिक्षक सुदर्शन मुंडे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार, पो.हे.कॉ गिते,पो.हे. कॉ साळवे व पो.कॉ राजपुत यांनी ही कामगिरी केली आहे.