विद्यार्थ्यांनी कोणत्याही कामाला कमी न लेखता त्या कामाला आपल्या कौशल्यातून प्रतिष्ठा प्राप्त करावी

अकोले प्रतिनिधी –
कोणतेही काम हलके नसते,विद्यार्थ्यांनी कोणत्याही कामाला कमी लेखू नये,उलट त्या कामाला आपल्या कौशल्यातून प्रतिष्ठा प्राप्त करुन द्यावी असे प्रतिपादन अकोले औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे चे सेवानिवृत्त प्राचार्य विद्याचंद्र सातपुते यांनी केले.
अकोले येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यकमात प्रमुख पाहुणे म्हणून ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकोले तालुका एज्यूकेशन सोसायटी चे शिक्षणाधिकारी संपतराव मालुंजकर होते.
यावेळी व्यासपीठावर प्रभारी प्राचार्य एम. जी. गायकर, निदेशक आर. के. आरोटे, एस. एन.हासे, एस. यु. देशमूख, बी. डी. धुमाळ, ए. आर. भालेराव, पी. बी. नवले, बी. जे. वैद्य, एन. जी.थटार, ए. डी. घुले, एस. पी. वैद्य, एस. एस. मंडलिक, बी. एम. धुमाळ, डी. व्ही. धुमाळ आदिसह शिक्षक दिनानिमित्त प्राचार्य व निदेशक, शिपाई झालेले विद्यार्थी, प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
यावेळी श्री. सातपुते पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपण निवडलेल्या व्यवसायात कौशल्य प्राप्त करुन स्वतः ला सिद्ध करावे. स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करावा. शिक्षक चुकला तर अनेक पिढ्या बरबाद होऊ शकतात, म्हणून शिक्षकांवर मोठी जबाबदारी असून समाजाचा शिक्षकांवर अजूनही प्रचंड विश्वास असून आदर आहे. आपला विद्यार्थी मोठ्या पदावर गेलेले पाहणे ही त्या शिक्षकांसाठी अभिमानाची बाब असते. विद्यार्थ्यांनी व्यवसाय प्रशिक्षणाचा मार्गदर्शन निवडून आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित केले आहे. त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करून संस्थेत असलेल्याकुशल व अनुभवी निदेशकाकडून जास्तीत जास्त ज्ञान मिळवावे असे मत व्यक्त केले
यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना एस पी मालुंजकर यांनी सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिक्षक झालेल्या विदयार्थ्यांनी आपले अनुभव व्यक्त केले.
प्रभारी प्राचार्य एम. जी. गायकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करुन शिक्षक दिनाचे महत्व सांगितले.
सूत्रसंचालन आर. के. आरोटे यांनी केले. सर्व उपस्थितीतांचे आभार मानले.
अध्यक्ष पदाची सूचना ए. डी. घुले यांनी मांडली तर त्यास अनुमोदन एस. यु. देशमुख यांनी दिले.
या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी आर. के. आरोटे, एस. यु. देशमुख, ए. डी. घुले, ए. आर. भालेराव, धुमाळ बी. एम., धुमाळ डी. व्ही. सर्व निदेशकांनी परिश्रम घेतले.