विद्या भडके यांना अभिनव खानदेश प्रेरणादायी महिला पुरस्कार

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
‘प्रज्ञावंतांची समाजाला आवश्यकता असून विद्या भडके सारख्या महिला ज्ञानदानासोबतच साहित्यिक कार्यात असल्याने त्यांच्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा वृंदावू शकतात म्हणूनच अशा महिलांचा गौरव करताना आनंद होतो आहे.’,असे प्रतिपादन धुळ्याच्या महापौर सौ.प्रतिभाताई चौधरी यांनी केले.
अभिनव खानदेशच्या उपसंपादिका सौ.नलिनी सूर्यवंशी यांच्या तृतीय स्मृती दिनानिमित्त साहित्य,कला,सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्वान महिलांचा सन्मान त्यांच्या हस्ते करण्यात आला,त्यावेळी त्या बोलत होत्या.धुळे येथील शिवतीर्थ नागरी संघात झालेल्या कार्यक्रमास आमदार शरद पाटील, ज्येष्ठ पत्रकार बापू ठाकूर,प्रभाकर सूर्यवंशी,बापूसाहेब देसले,विजय थोरात,अनिल चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून होते.
श्रीमती विद्या भडके यांच्या साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.त्यांचे दोन कवितासंग्रह प्रसिद्ध असून त्या शब्दगंध साहित्यिक परिषद,शेवगाव शाखेच्या सह सचिव म्हणून कार्यरत आहेत.मुंबई,पुणे,शिरपूर, सांगली,बोधेगाव येथील निवडक नऊ महिलांना हा पुरस्कार देण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे नियोजन प्रभाकर सूर्यवंशी यांनी केले होते.श्रीमती विद्या भडके यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सुनील गोसावी,अध्यक्ष राजेंद्र उदागे,शेवगाव शाखेचे अध्यक्ष हरिभाऊ नजन, शहाराम आगळे,आर आर माने, बाप्पुसाहेब भोसले यांनी अभिनंदन केले आहे.