सिन्नरच्या पार्वतीबाई बिडवे उर्फ ‘नानी’ यांचे दुःखद निधन

राजूर : प्रतिनिधी
दि. ४, : नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमधील नाभिक समाजातील जेष्ठ महिला गं.भा. पार्वतीबाई शंकर बिडवे उर्फ ‘नानी’ यांचे सोमवार दि.३ रोजी रात्री २. ३० वाजता अल्पशा आजारात वृद्धपकाळाने त्यांच्या सिन्नर मधील राहत्या घरी निधन झाले.
मृत्यूसमयी त्या ९४ वर्षाच्या होत्या.बुधवार दि.४ जुन रोजी सिन्नरच्या संगमनेर नाका येथील वैकुंठ धाम मध्ये सकाळी ११ वाजता अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिव देहावर अंतिम संस्कार करण्यात आले.यावेळी स्थानिक समाज बांधवांसह अहिल्यानगर, पुणे आणी नाशिक जिल्ह्यातील बहुसंख्य नातेवाईक, सगे सोयरे उपस्थित होते.
प्रामुख्याने नाशिक, पुणे, संभाजीनगरआणी अहिल्यानगर जिल्ह्यात अग्रगण्य असलेल्या नाभिक समाजाच्या बिडवे परिवारातील कै. पार्वतीबाई उर्फ नानी या कै.ह.भ.प. शंकरराव विठोबा बिडवे यांच्या पत्नी तर जेष्ठ नाभिक समाजसेवक कै. केशवराव बिडवे,उद्योजक कै.उत्तमराव बिडवे आणी श्री. ज्ञानेश्वरराव बिडवे यांच्या मातोश्री होत्या.
पती शंकरराव बिडवे उर्फ नाना यांच्या निधणानंतर जवळ जवळ १४ वर्ष नानी बिडवे कुटुंबाची सावली बनून वावरल्या. साध्या, भोळ्या आणी भाबड्या स्वभावाच्या नानीने आपल्या कुटुंबाप्रमाणेच इतर नात्यांना देखील आपुलकी, प्रेम आणी खुप जीव लावला होता.आणी म्हणूनच नानी उर्फ पार्वतीबाई केवळ बिडवे परिवारातच नाही तर सर्व नात्यागोत्यात, सग्यासोयऱ्यात आणी त्यांच्या देवपूर गावात देखील प्रचलित होती.
कोरोना काळात तर याच नानीवर दुःखाचा डोंगरच कोसळला होता. जेष्ठ समाजसेवक केशवराव आणी उद्योजक उत्तमराव या दोन तरुण मुलांच्या आकस्मित निधनाचा खुप मोठा धक्का एक आई म्हणून नानीला सहन करावा लागला होता. दुर्दैवाचीबाब म्हणजे या महाकाय दुःखाच्या धक्क्यातून सावरत आतानाच काल आकस्मितपणे नानीने या जगाचाच निरोप घेतला आणी संपूर्ण बिडवे परिवाराला पोरके केल्याची शोकाकुल प्रतिक्रिया त्यांचेच कनिष्ठ चिरंजीव ज्ञानेश्वर बिडवे यांनी अंत्यविधीच्या वेळी दिली.
दरम्यान कै. पार्वतीबाई बिडवे उर्फ ‘नानी’ यांचा दशक्रिया विधी शुक्रवार दि. १३ जुन रोजी सकाळी आठ वाजता दयानंद महाराज मठ बारादरी येथे संपन्न होणार आसल्याचे बिडवे परिवाराच्या वतीने सांगण्यात आले आहे.