महिलांसाठी ‘सेल्फी विथ ट्री’ ‘वृक्षारोपण’ स्पर्धेचे आयोजन

.
सोलापूर : येथील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन संचलित पद्मशाली सखी संघम आणि महापालिका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील महिलांसाठी वृक्षारोपण करताना ‘सेल्फी विथ ट्री’ ही अभिनव स्पर्धा गणेशोत्सवानिमित्त आयोजित केल्याची माहिती अध्यक्षा ममता मुदगुंडी आणि सोलापूर महापालिका पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण बनसोडे यांनी दिली.
सोलापूर शहरात दिवसेंदिवस उष्णता वाढत आहे.
शहरात झाडांची कमतरता असल्याने उन्हाचा त्रास प्रत्येकालाच सोसावा लागतो. तेव्हा वृक्षारोपण आवश्यक आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने रोपांना वाढ होण्यासाठी अनुकूल, पोषक वातावरण आहे.
पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने रोपांची लागवड करुन जतन करणे महत्वाचे आहे. त्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे. कमीत कमी एक – दीड फुटांचे रोपांची लागवड करतानाचे सेल्फी फोटो काढून (9175988940) या व्हॉटस्ॲप क्रमांकावर दि. १५ ते २७ सप्टेंबर रात्री पर्यंत पाठवून दिले पाहिजे. रोपांची लागवड करताना पुन्हा काढण्याची गरज भासू नये याची काळजी घ्यावी. ही स्पर्धा ‘फक्त सोलापूर शहरातील’ समस्त महिला वर्गासाठी आहे. आलेल्या फोटो मधून ‘लकी ड्रॉ’ पध्दतीने निकाल जाहीर करण्यात येतील.

असे आहे बक्षीसाचे स्वरुप :
प्रथम क्रमांक – ‘ट्रव्हल बॅग’ (मनोज यलगुलवार यांच्यातर्फे), द्वितीय क्रमांक – ‘सँडविच टोस्टर’ (नरेंद्र धारा यांच्यातर्फे), तृतीय क्रमांक – ‘टोस्टर’ (तुषार जक्का यांच्या तर्फे) तर, उत्तेजनार्थ – ‘लेडीज छत्री’ (नागेशकुमार गंजी (युनिक टॉऊनतर्फे). तसेच प्रत्येक स्पर्धकाला सहभाग ‘प्रमाणपत्र’ देण्यात येणार आहे.
या अनोख्या स्पर्धेत जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे तसेच अधिक माहितीसाठी 9175988940 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावे, असे आवाहन सखी संघमच्या उपाध्यक्षा जमुना इंदापूरे, सचिवा ॲड. रेखा गोटीपामूल आणि महापालिका पत्रकार संघाच्या सरचिटणीस प्रमिला चोरगी, सहसचिवा ममता तलकोकूल, खजिनदार दर्शना सोमा, सहखजिनदार लक्ष्मी कोडम, कार्याध्यक्षा वरलक्ष्मी गोटीपामूल, समन्वयिका अरिता इप्पलपल्ली, अंबुबाई पोतू, कला चन्नापट्टण यांनी केले आहे.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सदस्या रजनी दुस्सा, भाग्यश्री पुंजाल, सुरेखा गोली, लता मुदगुंडी, आरती बंडी, सारिका वंगा, दिव्या रच्चा, पल्लवी संगा, प्रिती बंडी, जयंती बंडी, सुरेखा भिमनपल्ली, स्वरुपा बंडी, स्वाती इंदापूरे, लता बंडी, विजया बत्तुल, विशाखा सरगम, पद्मा उपलंची, प्रभावती दोरनाल, वंदना बंदगी, दुर्गा रेस, नर्मदा रेस, मुक्ता बल्ला, उमा शंकूर, कलावती येलदी, संगीता म्याकम, प्रतिभा दासरी, ममता बोलाबत्तीन, वज्रेश्वरी गाजूल, साधना बेत, प्रमिला चन्नापट्टण आदी प्रयत्नशील आहेत.