समाज घडविण्यासाठी शिक्षकांचे कार्य मोलाचे ” – प्रा.सौ.बिना सावंत

“
राजूर /प्रतिनिधी
” शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या जीवनात रंग भरण्याचे कार्य करत असतो. शिक्षकाचे आदर्श गुण हे विद्यार्थ्यांना दिशादर्शक ठरतात. आदर्श समाज घडविण्यासाठी शिक्षकांचे कार्य मोलाचे आहे “असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या व राष्ट्रसेवा दल सदस्या प्रा.सौ.बिना सावंत यांनी केले.
त्या राजूर येथील ॲड.एम.एन.देशमुख महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी कल्याण विभाग यांनी आयोजित केलेल्या ” शिक्षक दिन “कार्यक्रम प्रसंगी बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ.बी.वाय. देशमुख उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. देशमुख म्हणाले की,” शिक्षकी पेशा स्वीकारणे हे एक मोठे व्रत असून विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हा शिक्षकाचा खरा बहुमान असतो. विद्यार्थी आणि शिक्षक यांचे नाते अतूट आहे.आदर्श समाज निर्मितीमध्ये युवकांनी पुढे यावे ” या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.व्ही.एन. गीते (विद्यार्थी कल्याण विभाग प्रमुख) यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे आपले मनोगते व्यक्त करून उपस्थित शिक्षकांना गुलाब पुष्प देऊन सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास देशमुख व सौरभ बिडवे या विद्यार्थ्यांनी केले. तर आभार प्रदर्शन विकास बिडवे यांनी केले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.बी.के.थोरात (कार्यक्रमाधिकारी रासेयो )प्रा.एस वाय.हांडे,प्रा.एस.आर. शिंदे,प्रा.अस्वले, यांनी विशेष परिश्रम घेतले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.