जायनावाडी येथे बैलपोळा उत्साहात साजरा.

अकोले/प्रतिनिधी-
अकोले तालुक्यातील अति दुर्गम भाग म्हणून ओळखल्या गेलेल्या जायनावाडी येथे मोठ्या उत्साहात बैलपोळा साजरा करण्यात आला.
यावेळी गावातील सर्व शेतकरी बांधवांनी शेतीमध्ये आयुष्यभर साथ देणाऱ्या आपला सर्जा, राजाची मिरवणुक काढून मोठ्या संख्येने सहभागी होऊन बैलपोळा उत्साहात साजरा केला.
यावेळी जायनावाडी येथील श्री. भैरवनाथ मंदीर येथे मंदिराला दरवर्षाप्रमाणे पाच फेरे मारून बळीराजाला सलामी देण्यात आली. त्यानंतर महादेवाच्या मंदिराला फेरे मारून विठ्ठल रुख्मिणी मंदीर येथे बळीराजाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून त्यांचे पुजन करण्यात आले.
यावेळी गावातील शेतकरी विठ्ठल भांगरे, भोरु भांगरे , सोमनाथ भांगरे, संदीप भांगरे, बाजीराव भांगरे संपत भांगरे, मारुती भांगरे , सुभाष भांगरे, किसन भांगरे, हरिदास भांगरे,धर्मा भांगरे , कैलास भांगरे, तुकाराम भांगरे, वाळु भांगरे , काळु भांगरे, मच्छींद्र भांगरे यांसह सर्व ग्रामस्थांनी व परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आनंद व्यक्त केला.