पारनेर , मधील महिलांचे मोहटादेवी दर्शन.खा. निलेश लंके प्रतिष्ठानचा उपक्रम.

दत्ता ठुबे
पारनेर दि.१०
खा. निलेश लंके व जिल्हा परिषद सदस्या राणी ताई लंके यांच्या संकल्पनेतून निलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( शरदचंद्र पवार) यांच्या वतीने पारनेर शहरातील प्रभाग क्रमांक नऊ मधील मोलमजुरी ,कष्टकरी शेतकरी महिला, तरुणी , जेष्ठ महीला वर्गाला मोहटादेवी दर्शन सहल आयोजित करण्यात आली होती.
यावेळी राष्ट्रवादी कांग्रेसचे नेते बाळासाहेब शेटे व सचिन नगरे यांच्या मार्गदर्शन खाली शहरातील प्रभाग क्रमांक नऊ मधील महिलांना मोहटादेवी दर्शन सहलीचे आयोजन करण्यात आले होते. सहलीला प्रस्थान करतेवेळी नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आला.
यावेळी शिक्षक नेते रा या औटी, माजी उपसरपंच अनुसया गायकवाड, निलेश लंके प्रतिष्ठान विसापूर, अध्यक्ष राजेंद्र गटणे, अरूण जाधव,राष्ट्रवादी नेते राजेश चेडे, राजुसेठ शेरकर, जाकिर शेख, द्यानदेव कानडे, रघुनाथ व्यवहारे, सचिन बुगे, आदीसह प्रभागातील महीला बहुसंख्येने उपस्थित होत्या.