जायनावाडी ,बिताका येथे अमृत कलश यात्रेला उत्साहात प्रारंभ.

अकोले /प्रतिनिधी-
आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत “मेरी माटी मेरा देश” या उपक्रमामध्ये अमृत कलश यात्रेला ग्रामपंचायत जायनावाडी बिताका येथे प्रारंभ करण्यात आला.
महाराष्ट्र शासन ग्रामविकास व पंचायत राज विभाग यांच्या आदेशान्वये आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत ‘मेरी माटी मेरा देश’ या उपक्रमामध्ये दिनांक 1 सप्टेंबर ते 1 नोव्हेंबर 2023 या कालावधीत अमृत कलश यात्रा आयोजित करण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिलेल्या आहेत. या उपक्रमांतर्गत दिनांक 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीत गाव स्तरावरील करावयाच्या उपक्रमामध्ये प्रत्येक गावचा एक अमृत कलश तयार करण्यासाठी प्रत्येक घरातून माती किंवा एक चिमूटभर तांदूळ त्या अमृतकलशामध्ये जमा करावयाची आहे.
सदर अमृत कलश यात्रेला ग्रामपंचायत जायनावाडी बिताका येथे उत्साहात प्रारंभ करण्यात आला. सदर अभियानात गावातील नागरिकांनी सहभागी होणे बाबत ग्रामपंचायतीच्या वतीने आवाहन करण्यात आले.
“मेरी माटी मेरा देश” या उपक्रमामधील गाव स्तरावरील अमृतकलश हा तालुकास्तरावर जमा करायचा आहे. दिनांक 1 ते 13 ऑक्टोबर 2023 या कालावधीत तालुकास्तरावरील उपक्रम आहेत. त्यानंतर जिल्हास्तरावरील नियोजन आहे. दिनांक 22 ते 27 ऑक्टोबर 2023 या कालावधीत राज्यस्तरावरील व दिनांक 28 ते 30 ऑक्टोबर 2023 या कालावधीत राष्ट्रीय स्तरावरील उपक्रम आहेत. दिनांक 1 नोव्हेंबर 2023 रोजी दिल्ली येथे माननीय प्रधानमंत्री , भारत सरकार यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाचे आयोजन असेल.
या अमृत कलश यात्रेच्या उपक्रमामध्ये ग्रामपंचायतीचे सरपंच बाळू डगळे , उपसरपंच मनीषा भांगरे , ग्रामपंचायत सदस्य बाजीराव भांगरे , पंढरी पेढेकर , ग्रामसेवक बापूसाहेब राजळे , तसेच गोरख भांगरे , संदीप भांगरे , सोमनाथ भांगरे , संपत भांगरे ,देवराम भांगरे , सुभाष भांगरे , सर्पमित्र विठ्ठल भांगरे , मच्छिंद्र भांगरे , तुकाराम भांगरे , ग्रामपंचायत कर्मचारी निवृत्ती भांगरे , केंद्र चालक बाळू मेंगाळ , अंगणवाडी सेविका अलका भांगरे , सोमाबाई भांगरे , जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद , शाळेतील सर्व विद्यार्थी व गावातील अनेक नागरिकांनी सहभाग घेतला.