नीतीन कोते यांनी केले अनाश्रमा रस्त्याचे स्वखर्चाने मुरुमीकरण !

शिर्डी प्रतिनिधी
(संजय महाजन)
शिर्डी शहरालगत असलेल्या साई निवारा येथील साई आश्रया अनाथाश्रमात जाण्या येण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रस्ता खराब झाल्यामुळे या आश्रमातील वयोवृद्ध शालेय विद्यार्थी व महिलावर्ग यांना मोठ्या प्रमाणावर मोठा त्रास सहन करावा लागत होता पावसाळ्यात तर मोठ्या प्रमाणावर विविध अडचणीला सामोरे जावे लागत असल्याने शिर्डी येथील युवा शिर्डी ग्रामस्थ या संघटनेचे सामाजिक कार्यकर्ते नितीन अशोक कोते यांनी पुढाकार घेऊन सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून एक किलोमीटर रस्त्याचे ८० हजार रुपये खर्च करून मुरमीकरण करून देत सामाजिक दातृत्व समाजापुढे ठेवले आहे.
नितीन अशोक कोते म्हणाले की समाजामध्ये सर्वकाही विविध अडचणी शासनाने सोडवल्या पाहिजे यावर अनेक जण अवलंबून असतात त्याला समाजातील अनेक घटक देखील अपवाद नाही मात्र शिर्डी शहरात असलेल्या सबका मालिक एक प्रतिष्ठानच्या साई आश्रया अनाथ आश्रमात गेल्या अनेक वर्षांपासून स्त्री पुरुष वयोवृद्ध विधवा लहान मुले मुली यांचा सांभाळ अध्यक्ष गणेश दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली केला जातो या आश्रमात जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अंतर्गत रस्ता खाच खळगे व मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने रस्ता खराब झाला होता त्यामुळे आश्रमात राहत असलेल्या अनेकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत होता हि अडचण दूर झाली पाहिजे असा संकल्प आपण केला होता त्यासाठी जवळपास ८० हजार रुपये खर्च करुन एक किलोमीटर रस्त्याचे मुरमीकरण करुन जेसीबीच्या माध्यमातून रस्त्याचे काम करून दिले असून यातून मिळालेले समाधान मोठे असल्याचे सांगितले त्यांनी या अगोदर देखील अनाथ मुलांसाठी विविध उपक्रम राबवले आहेत या सामाजिक उपक्रमाचे शिर्डी सह पंचक्रोशीत कौतुक होत आहे.