अकोले देवठाण रोड वर झाडांची कत्तल !

अकोले प्रतिनिधी –
अकोले देवठाण रोड लगत मोठापुल ते पंपाजवळील झाडांची कत्तल होत आहे या बाबतचे निवेदन वनपरिक्षेत्र अधिकारी महाराष्ट्र वनविभाग अकोले यांना देण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र ग्राहक पंचायतचे जिल्हा उपाध्यक्ष मच्छींन्द्र मंडलिक, जिल्हा सहसचिव रमेश राक्षे यांनी दिली.
सध्या अकोले – देवठाण रोड रस्त्याचे काम चालू आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी शेकडो झाडे आहे. हे झाडे येथील येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचा , पक्षी, प्राण्यांचा ऊन पाऊस यांपासून निवाऱ्याचा आधार आहे. झाडे हे येथील रस्त्यांचे प्राचीन वैभव आहे. तसेच कोल्हार -घोटी- संगमनेर, अकोले, राजुर, बारी पर्यंतच्या राज्य मार्गाबाबतही असेच झाले.

गेली ५-६ वर्षांपासून रस्त्यांचे काम चालू आहे मात्र शेकडो वर्षांपूर्वीच्या चिंच, लिंब, आंबा, जांभळ , वड इ. झाडांची कत्तल सरलाट केल्याने राज्य मार्गाचा परिसर निर्जन झाला आहे. यात बरेच झाडे वाचवता आले असते मात्र अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणा , जाणीवपुर्वक दुर्लक्ष,अल्पदॄष्टीने मोठे नुकसान झाले. ह्या रस्त्याला अद्यापही नवीन झाडे लागलेली नाहीत. यामुळे रस्ता पूर्ण बोडखा आहेत. पर्यावरणास मोठा धोका आहे. वरील याची चौकशी व्हावी असे निवेदनात म्हटले आहे .
निवेदनाच्या प्रति वनमंत्री सुधिर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम अकोले, कार्यकारी अभियंता संगमनेर विभाग, यांना पाठवण्यात आल्या आहेत. निवेदना वर मच्छींन्द्र मंडलिक, रमेश राक्षे, दत्ता शेनकर, राम रुद्रे , ज्ञानेश्वर पुंडे,भाऊसाहेब वाकचौरे, दत्ता ताजणे, मच्छींन्द्र चौधरी आदींची सह्या आहेत.
–