ऋषिपंचमी निमित्त कोतुळ येथे सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन

कोतुळ /प्रतिनिधी
कोतूळ (ता.अकोले) येथील इच्छित मनोकामना पूर्ण करणाऱ्या व नवसाला पावणाऱ्या श्री वरद विनायक मंदिरात जय भवानी संस्कृती संवर्धन मंडळाच्या वतीने ऋषिपंचमी निमित्त बुधवार २० सप्टेंबर ला सकाळी सहा वाजता सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री गणेश उपासना ही ऐक्य बंधुभाव वाढवणारी व राष्ट्रीय एकात्मता व कार्यक्षमता वाढवणारी आहे म्हणून या सामुदाईक अथर्वशीर्ष पठण आयोजित करण्यात आले आहे. अथर्वशीर्ष पठणाचे हे अकरावे वर्ष असून कोतूळ सारख्या ग्रामीण भागात भल्या पहाटे शेकडो गणेश भक्तांचा वाढता प्रतिसाद हे या कार्यक्रमाचे आगळे वेगळे वैशिष्ट्य ठरत आहे.
एकच वेळी एकाच वेळी शेकडोमुखातून निर्माण होणा-या ध्वनी लहरी ने परिसरातील वातावरण भक्तीमय बनते अनेक महिला भाविक भल्या पहाटे पायी चालत येऊन या कार्यक्रमात सहभागी होत असतात. यावेळी देवस्थानच्या वतीने प्रसादाचे आयोजन केले आहे. सामुदायिक अथर्वशीर्ष पठणासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष प्रदीप भाटे, विनय समुद्र, कुलदीप नेवासकर, संभाजी पोखरकर, संतोष नेवासकर, विशाल बो-हाडे, प्रणव परशुरामी, अनिल पाठक, निवृत्ती पोखरकर, विजय तोरकडे, सचिन पाटील,दिपक राऊत,वेदांग समुद्र, आदींनी केले आहे.