रोटरी क्लब ऑफ नाशिक तर्फे इंटरॅक्ट क्लब ची आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धा संपन्न
नाशिक प्रतिनीधी
रोटरी क्लब ऑफ नाशिक आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धा दि २२/०९/२४ रविवारी विस्डम हायस्कूल गोवर्धन येथे संपन्न झाली.
विद्यार्थ्यांना बालवयात नेतृत्व ,सामाजिक बांधिलकी,व्यक्तित्व विकास ,जवाबदार नागरीक बनवणे ह्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे ह्यासाठी इंटरॅक्ट क्लब कार्यरत असते.
रोटरी क्लब ऑफ नाशिक तर्फे विविध माध्यमाच्या १६० शाळांमध्ये इंटरॅक्ट क्लब कार्यान्वित आहे.
विशेष म्हणजे तळागाळातील, वंचित तसेच उच्चभ्रू ,शहरी,ग्रामीण अशा सर्वांसाठी विविध उपक्रम इंटरॅक्ट क्लब राबवित असते त्यासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिक आवश्यक ते सहकार्य व मार्गदर्शन करीत असते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने झाली.
स्रोटरी क्लब ऑफ नाशिक अध्यक्ष ओमप्रकाश रावत,सचिव शिल्पा पारख,उपाध्यक्ष विजय दिनानी, हृषिकेश समन्वार ह्यानी विद्यार्थ्यांना इंटरॅक्ट क्लब विषयी मार्गदर्शन केले.
माधुरी रासकर ,मेघना काळे विस्डम हायस्कूल ह्यांचे मोलाचे सहकार्य ह्या बुद्धिबळ स्पर्धेसाठी लाभले.
स्पर्धे चे यशस्वी नियोजन इंटरॅक्ट संचालक आदिती अग्रवाल,वंदना समन्वार ,मंथ लीडर डॉ सुप्रिया मांगुळकर ह्यानी केले.
बुद्धिबळ स्पर्धेत प्रामुख्याने
विस्डम हायस्कूल गोवर्धन, अशोका यूनिवर्सल स्कूल,विद्या प्रबोधिनी प्रशाला,ग्लोबल व्हिजन स्कूल ( एसएससी),ग्लोबल व्हिजन स्कूल(सीबीएसई),
सिंधू सागर अॅकेडमी ,के. बी. एच. विद्यालय गिरनारे ,आर .के. कलानी महाविद्यालय ह्या शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते.
स्पर्धा अतिशय उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या.
स्पर्धेत विविध शाळांच्या ६५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
सर्व स्पर्धकांना प्रशास्तीपत्र रोटरी पदाधिकार्यांच्या शुभहसते देण्यात आली.
स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थ्यांचा यथोचित गौरव अध्यक्ष ओमप्रकाश रावत ह्यानी केला.
विस्डम हाय स्कूल च्या वतीने सर्व स्पर्धक विद्यर्थी, विविध शाळांचे प्रतिनिधी शिक्षक ,उपस्थित रोटरी सभासद ह्यांची भोजन,अल्पोपहार आदि उत्तम व्यवस्था ठेवण्यात आली होती .विस्डम हायस्कूल संचालक,मुख्याध्यापक, शिक्षक, ह्यांनी केलेल्या अनमोल सहकार्य बद्दल रोटरी क्लब ऑफ नाशिक तर्फे इंटरॅक्ट संचालक आदिती अग्रवाल,वंदना समन्नवार ह्यानी आभार प्रदर्शित केले.
सहभागी विद्यार्थ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपले मनोगत व्यक्त केले.तसेच आपापल्या शाळेत करण्यात येणाऱ्या नावीन्यपूर्ण उपक्रमाविषयी माहिती देत उपस्थितांशी संवाद साधला.