इतर

रोटरीतर्फे उन्नती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी अशोका स्कूल येथे ‘स्वप्नातील पाठशाळा’ रायला शिबिर

नाशिक दि 26 – रोटरी क्लब ऑफ नाशिक तर्फे उन्नती विद्यालय पेठरोड च्या ७१ विद्यार्थींसाठी रायला स्वानातील पाठशाळा हे शिबिर अशोका यूनिवर्सल स्कूल अर्जुननगर येथे १९/१०/२४ ला उत्साहात संपन्न.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व ,कला,क्रिडा,खेळ कैशल्य विकासासाठी रायला शिबिर रोटरी क्लब ऑफ नाशिक आयोजित करत असते.


कार्यक्रम प्रारंभी दीप्रज्वलन रोटरी एनक्लेव्ह चेअरमन अवतारसिंह ,असिस्टंट गव्हर्नर प्रफुल्ल बर्डिया,अध्यक्ष ओमप्रकाश रावत हायांच्या शुभहस्ते पार पडले.रोटरी क्लब ऑफ नाशिक अध्यक्ष ओमप्रकाश रावत ह्यानी अशोका स्कूल च्या सुदीप्ता दत्ता, प्रमोद त्रिपाठी,अनुत्तमा पंडित,अपर्णा मटकरी ,अर्चना येवले यांचा स्मृतिचिन्ह देवून सत्कार केला.पारंपारिक सरस्वती पूजन राज तलरेजा, ,वैशाली रावत,दमयंती बर्डिया यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
शिबारासाठी विद्यार्थ्यांची निवड उन्नती शाळेचे प्राचार्य आर बी राणे यांच्या मार्गदर्शनाने एस. बी.सोनजे , जे. टी.चिंचोरे सि. व्ही. बागडे , आदिती जोशी ह्या शिक्षकांनी गुणवत्तेच्या आधारे केली .


विद्यार्थ्यांना विविध कला ,क्रिडा,तंत्रज्ञान कौशल्य, कराटे ह्याविषयी शिबिरात अशोका च्या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
रोटरी क्लब ऑफ नाशिक अध्यक्ष ओमप्रकाश रावत ह्यानी विद्यार्थ्यांना खडतर परिस्थितीत देखील जीवनात सर्वोच्च यश व किर्ती प्राप्त होऊ शकते असे प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले.


अशोका स्कूल मध्ये उपलबध सुविधा उन्नती शाळेच्या विद्यार्थ्यांना अनुभवता याव्या ह्या सामाजिक बांधिलकी तून रोटरी च्या रायला उपक्रमात अशोका इंट्रॅक्ट क्लब चे विद्यार्थी, शिक्षक व व्यवस्थापनाने उपक्रम राबविल्याचे व्हाइस प्रिन्सिपल प्रमोद त्रिपाठी यांनी स्पष्ट केले.
अशोका इंटरॅक्ट क्लब च्या विद्यार्थ्यांनी प्रभावी सूत्र संचलन ,स्वागत गीत ,अप्रतिम समूह नृत्य सादर केले.
उन्नती च्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज ह्यांची कणखर आवाजात वंदना व सुंदर नृत्य सादर केले.
रोटरी क्लब ऑफ नाशिक चे जनसंपर्क संचालक निलेश सोनजे ,इंटरॅक्ट संचालक आदिती अग्रवाल,विक्रम खैरनार अशोका इंटरॅक्ट सल्लागार अर्चना येवले यांनी यशस्वी नियोजन केल्याने रयला चा हेतू साध्य झाल्याचे रोटरी क्लब ऑफ नाशिक सचिव प्रकल्प हेमराज राजपूत ह्यानी नमूद केले. उचभ्रू व तळागाळतील विद्यार्थी ह्याना एकत्र आणत मैत्री ,सेवा,नितीमूल्य शिकवणारा हा उपक्रम आयुष्यभर स्मरणात राहणारा असल्याचे मनोगत अशोका व उन्नतीच्या सहभागी विद्यार्थी, शिक्षक ह्यानी व्यक्त केले. रायला शिबिराचा दिवस म्हणजे अशोका व उन्नती च्या सहभागी सर्व विध्यार्थी व शिक्षक यांना काहीतरी अप्रतिम असा अनोखा अनुभव देऊन जाणारा दिवस ठरला. अष्टपैलू व्यक्तिमहत्त्व घडण्यासाठी अनमोल असे मार्गदर्शन ह्या शिबिरात मिळाले .
अशोका च्या विद्यार्थ्यांनी आपल्या आचरणात दाखवलेले नेतृत्व, आपुलकी ,नम्रता व उन्नतीच्या विद्यार्थ्यांचे जिद्द ,आत्मविश्वास हे कौतुकास्पद असल्याची भावना रोटरी पदाधिकार्यांनी व्यक्त केली.
शिबिराची सांगता स्वसंरक्षण प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिकाने झाली. आभार प्रदर्शन रोटरी क्लब ऑफ नाशिक सचिव प्रशासन शिल्पा पारख ह्यानी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button