इतर

अगस्ती महाविद्यालय बी . ए . भूगोल चा १०० टक्के निकाल .


अकोले : प्रतिनिधी

अगस्ती महाविद्यालयातील बी . ए . भूगोल विषयाचा शंभर टक्के निकाल सोमवार , 18 सप्टेंबर रोजी ऑनलाईन जाहीर झाला
अंतर्गत गुण भरण्यातील तांत्रिक त्रुटींमुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत अन्य महाविद्यालयांसह अगस्ती महाविद्यालयाच्या बी . ए . निकालाबाबत समस्या निर्माण झाली होती . तथापि विद्यापीठ आणि परीक्षा विभागासह कुलगुरू तसेच उपकुलसचिवांचे अनमोल सहकार्य याशिवाय अगस्ती चे प्राचार्य आणि प्राध्यापक वर्गाने परिश्रमपूर्वक वारंवार केलेल्या पाठपुराव्यामुळे विद्यापीठाच्या पुनर्मुदतीत अंतर्गत गुण दाखल केले .

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . भास्कर शेळके तसेच प्राध्यापकांचे अभिनंदन होत असून विद्यार्थ्यांचे नुकसान झाले नाही याचा मनस्वी आनंद व्यक्त होत आहे .

अकोले एज्युकेशन संस्थेचे कार्य . विश्वस्त माजी मंत्री मधुकरराव पिचड , कायम विश्वस्त मा . आमदार वैभवराव पिचड , गिरजाजी जाधव , विश्वस्त मंडळ , अध्यक्ष सुनील दातीर , सचिव सुधाकर देशमुख , कार्यकारिणी यांनी विद्यार्थ्यांसह प्राचार्य तसेच प्राध्यापकांचे अभिनंदन केले आहे .
——————————————
🗒🗒

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button