शेवगाव तालुक्यातील खरडगाव ते सुसरे या रस्त्यावरील नांदणी नदीवरील पूल नदीच्या पुलाच्या कामाला मंजुरी

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव-पाथर्डी तालुक्याला जोडणारा शेवगाव तालुक्यातील खरडगाव ते सुसरे या रस्त्यावरील नांदणी नदीवरील पूल दळणवळणाच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाचा आहे. या पुलाच्या बांधकामासाठी मा.जि.प.सदस्या सौ.हर्षदाताई काकडे यांच्यासोबत अहमदनगर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता श्री.कुलकर्णी साहेब, रो.ह.यो.(कार्य) विभाग अहमदनगर, यांच्यासह नाशिक विभागाकडे वेळोवेळी निवेदनाद्वारे पाठपुरावा केल्यामुळेच या नांदणी नदीवरील पुलाच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. त्याची निविदा प्रसिद्धी पत्रकात आली असल्याने जनशक्ती विकास आघाडी व खरडगाव ग्रामस्थांच्या प्रयत्नांना यश आल्याची माहिती खरडगावचे माजी सरपंच श्री.भगवानराव डावरे यांनी दिली.
दि.(०५) रोजी खरडगाव येथील ग्रामस्थांनी नांदणी नदीवरील पुलाच्या कामासाठी पाठपुरावाकरून पूल मंजूर करून आणल्याबद्दल जि.प.सदस्या सौ.हर्षदा काकडे यांचा मौजे खरडगाव ग्रामस्थांच्या वतीने शेवगाव येथे सत्कार करण्यात आला. यावेळी डावरे बोलत होते. यावेळी माजी उपसरपंच तुकाराम बोडखे, से.सो.चे.चेअरमन जगन्नाथ बोडखे, संचालक जयवंत काकडे, एकनाथ बोडखे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष तबाजी बोडखे, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर बोडखे, वसंतराव लबडे आदि यावेळी प्रमुख उपस्थितीत होते.
पुढे बोलताना डावरे म्हणाले की, नांदणी नदीवरील पूल हा दोन्ही तालुक्याला जोडणारा व दळणवळणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा फुल आहे. या कामामुळे गावाच्या विकासात नक्कीच भर पडणार आहे. येथील शेतकऱ्यांच्या ७० % हून अधिक जमिनी या नदीच्या दुसऱ्या बाजूला आहेत. हा पूल होणार असल्याने आता शेतीची मशागत करण्यासही मदत होणार आहे. पुलाच्या दुसऱ्या बाजूला गावची स्मशानभूमी असल्याने गावात एखादा ग्रामस्थ मयत झाला तर या पुलाअभावी त्यांना नदीपलीकडे घेऊन जाण्यास अडथळे येत होते, ही अडथळे देखील या पुलामुळे दूर होणार आहेत. दळणवळण वाढीसही याचा मोठा फायदा होणार आहे. या कामासाठी फक्त काकडे दांपत्यांनीच पाठपुरावा केला असल्याचेही भगवानराव डावरे यांनी यावेळी सांगितले.
चौकट :- पाठपुरावा केलेल्या कामाला जर यश आले तर त्याचा मोठा आनंद मिळतो. ग्रामस्थांनी मानलेल्या आभारामुळे पुन्हा अजून पुढे काम करण्यास शक्ती, प्रेरणा मिळाली
- सौ.हर्षदा काकडे – (मा.जिल्हा परिषद सदस्या )